अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
….. चं नाव घेण्यास आज शुभारंभ केला
….. रावांच्या बरोबर मन गेले गांगरुन
आईबाबांच्या आशिर्वादाची शाल घेते पांघरुन
कामाची सुरवात होते श्रीगणेशा पासून
….. चं नाव घ्यायला सुरवात केली आज पासून
आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले
….. चं नाव घ्यायला …. ने आडवले
ऑस्कर साठी चित्रपट निवडला “श्वास” …। झाली माझी लाडकी राणी खास
रोम इस द स्वीट आर्ट, …. इज इन माय हार्ट
स्वतंत्र भारताची राजधानी आहे दिल्ली, …. म्हणजे माझ्या हृदय कुलुपाची किल्ली
वाट चुकलेल्या वासराला नसतो कोणी धनी, …. चे रूप सदैव माझ्या ध्यानी मनी
Ukhane in Marathi For Groom
असावे नेहमी हसतमुख, बोलणे असावे गोड, …. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ
सोन्याचा कप आणि चांदीची बशी, …. माझी आहे जणू काही उर्वशी
श्रीकृष्णाच्या बाल लीला याशोधेला सोडतात हसवून
…. ला नेईल ‘हनिमूनसाठी’ विमानामध्ये बसवून.
लग्न ठरलं, हळद लागली, हातावर रेखली मेंदी, …. च्या सौंदर्याने मी झालो जायबांधी
असं म्हणतात प्रेम दिल्याने प्रेम वाढते
…. सारखी पत्नी मिळायला मोठे भाग्य लागते
Marathi Ukhane For Marriage Groom
हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली
आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने ….. माझी झाली
चांदीची वाटी नदीच्या काठी
…. ला देवाने घडवलंय माझ्याचसाठी
श्रीकृष्णाने भगवत गीतेतून जगाला केला उपदेश
……… ने माझ्या जीवनात केला (तारीख) ला प्रवेश
दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी,
…. चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी
काही शब्द येतात ओठांतून काही येतात गळ्यातून
मात्र …. चं नाव येतं थेट हृदयातून
पाव शेर रवा पाव शेर खवा
…. चे नाव घेतो हजार रुपये ठेवा
आंब्यात आंबा हापुसचा आंबा
…. चे नाव घेते तुम्ही थोडं थांबा
Marathi Ukhane for Grooms Funny