
आकाशाच्या अंगणात ब्रह्मा, विष्णू आणि महेश
….रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश
अत्रावळीवर पत्रावळी, पत्रावळीवर भात, भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रुप, रुपसारखा जोडा
…. रावांचे नाव घेते वाट माझी सोडा
गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
…. रावांच्या हातात हात देउन झाले मी निर्भर
नव्या घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मीचा वास
….. साठी घेते हा उखाणा खास
नवीन घराचा दिवा उजळला, भरली सुखाची कळी
…… चं नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी
तुळशीच्या माळेजवळी दरवळतो सुवास
…… चं नाव घेते शुभ गृहप्रवेशास
नववधूसाठी गृहप्रवेश उखाणे
हळदीकुंकू, अष्टगंध, नव्या गृहाची शान
माझे पती …… आहेत माझ्या आयुष्याची जान
विनोदी गृहप्रवेश उखाणे
नवीन घरात बसवला Wi-Fi पण पासवर्ड नाही माझ्याकडे
…….. ला विचारा, तीच सांभाळते सगळे!
Gruhapravesh Ukhane
गृहप्रवेश हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय खास आणि आनंदाचा क्षण. नवीन घरात प्रवेश करताना घेतले जाणारे उखाणे हा या शुभकार्याचा सुंदर भाग आहे. येथे तुम्हाला पारंपरिक, आधुनिक, विनोदी आणि सोपे गृहप्रवेश उखाणे आकर्षक स्वरूपात एकत्रित मिळतील.
गृहप्रवेश समारंभ हा नव्या घरात पाऊल ठेवताना आनंद, शुभाशीर्वाद आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. अशा वेळी घेतले जाणारे उखाणे हे केवळ नाव घेण्याचे साधन नसून संस्कृती, प्रेम आणि कुटुंबातील नात्यांचा स्नेह व्यक्त करण्याचा अनोखा मार्ग आहे. गृहप्रवेशाच्या पूजा–विधी, कलशारोहण, हवन, लक्ष्मीपूजन या सगळ्या विधींमध्ये महिलांनी घेणारे उखाणे हा कार्यक्रमाचा आकर्षक आणि पारंपरिक भाग ठरतो.
गृहप्रवेश कार्यक्रम प्रसंगी हे उखाणे तुमच्या समारंभात अधिक रंग भरतील. सोपे, आकर्षक आणि लक्षात ठेवण्यास सुलभ असे हे उखाणे नव्या घरातील आनंद अधिक सुंदर करतील यात शंका नाही.
