Marathi Short Jokes

दिवाळीचे रॉकेट पाहून जाणीव झाली – जीवनात ऊंच झेप घ्यायची असेल तर बाटलीचा सहारा घ्यावा लागतोच


भारतात बेरोजगारीची अवस्था अशी आहे की, नाल्यातून कचरा काढणारया JCB मशीनला पाहण्यासाठी पण ३०-४० लोकं उभे राहतात.


महाराष्ट्रात प्रत्येक आजारावर एकच रामबाण उपाय, “झोप जरा थोडा वेळ बर वाटेल”


बातमीचा उलटा परिणाम “प्रत्येक विवाहित स्त्रीकडे ५० तोळे सोने असायलाच हवे” असा महिलांचा गैरसमज झाला आहे.


“संधी” म्हणजे काय? – “बायकोच्या गालावर डास बसणे”

 


Marathi Small Jokes


 

नोकरी म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे, कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून बसता येत नाही


स्कूटी चालवणाऱ्या महिलांच्या चपला जास्त घासतात आणि ब्रेक लाइनर कमी.


काय दिवस आलेत… चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत आणि तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत


बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे, पुरुषांचे काय…. साधे असतात बिचारे बायका दिसल्या की लगेच खुश होतात


आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर लोकांपुढे असे विचार मांडा की लोकं म्हटली पाहिजेत, “असं तुझ्या बापानी तरी केलं होतं का?”


भारताकडे चांगला Boller नाही याचं मुख्य कारण हे आहे की भारता मध्ये लहाणपणापासुनच Batting झाल्यावर घरी पळून जायची सवय आहे

 


Small Funny Jokes in Marathi


 

आजकाल टिव्ही वर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय?


जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत


हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले


मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता


आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…. जी व्यक्ती तुम्हाला वेळेवर तंबाखू देते


मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो

 


Short Funny Jokes in Marathi


 

आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात”


बायका फार नशीबवान असतात कारण त्यांना बायका नसतात


हे एक गोष्ट खरी आहे हा… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नवे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच


अॅक्टीवाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे….


बाबा : आजपर्यंत तु असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल?
मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच?


लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते


I-Phone 8 हा लगातार सातवा असा फोन आहे जो आपल्याकडं नाहीय


मुलगी : तुझी आठवण येतेय
मुलगा : अजून पगार झाला नाही
मुलगी : अच्छा चल बाय

 


Marathi Small Jokes


 

तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकिच्या मुलीच्या प्रेमात पडला असेल तर त्याला अडवू नका
कारण अक्कल बदाम खाल्ल्याने नाही धोका खाल्याने येते


त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या
– सर आज तुम्ही गृहपाठ चेक करणार होता ना?


“बघून घेईन” म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा


आजची महत्वाची बातमी : भारी पावसानं पुण्यामध्ये जबरदस्त नुकसान
10-12 जणांची गायछाप भिजली

 


छोटे जोक्स मराठी


 

काय दिवस आलेत… चौथी पाचवीची पोरं प्रेमाच्या गप्पा मारतायंत..
आणि तरुण पोर pokemon पकडत फिरतायंत


समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न – पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कशा मिळतात??


सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग – डोकं तर खूप आहे त्याला पण तो अभ्यासच करत नाही


काही लोक नाकात बोट घालून बोट असे पाहतात की जसे नाकातून हिरा निघालाय


ज्यांचे पुण्य अपार असते … त्यांच्या बायकोचे महेर किमान ३०० किलोमीटर दूर असते


लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मर खान येउद्यात
हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागीण डान्स करतो

 


Short Jokes in Marathi


 

भारत सरकारचा नवीन नियम
ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल


एक माणूस मच्छिवालीला : ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहेत का?
मच्छिवाली : ए बाबा, मच्छि वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही


आयुष्यात कधी पाय डगमगला, कधी पडलो पण हिम्मत नाही हरलो
पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला, “वेटर, अजून एक खंबा आन”


तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात?
स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल


बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे
पुरुषांचे काय…. बायका दिसल्या की खुश होतात


व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील
पण लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे


बासुंदीचा फुल फॉर्म सापडला : बाई सुंदर दिसते


ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय…

 


Small Jokes in Marathi


 

चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस


लग्नापूर्वी शिट्टया मारत फिरणारे लग्नानंतर कुकरच्या शिट्ट्या मोजत बसतात


मिटिंग मध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो


 

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *