
हे ऐन थंडीतलं ऊन
कसलं असून नसल्या सारखं
रुसलेलं माणूस कोणी
गालात हसल्या सारखं
अनोळखी हास्य
गालातच हसतं
खुळं आपलं मन
अगदी अलगद फसतं
आयुष्यात प्रत्येकाचं
कोणावर तरी मन जडतं
प्रेम हे असंच
अबोल नजरेतून न सांगता घडतं
आजही मन माझे होते खूप उदास,
अजून होतो तुझ्या त्या आठवणींचाच आभास
होत नाही आजही विश्वास,
खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास
वाळकी पानं पडतात ना
सोसाट्याचा वारा सुटल्यावर
तशी तुझी स्वप्नं पडत राहतात
कधी चुकून डोळे मिटल्यावर
रोमँटिक चारोळ्या
तुझ्या नजरेत हरवून जावंसं वाटतं,
तुझ्या शब्दांत गुंतून राहावंसं वाटतं,
तू जवळ असशील तर सगळं पूर्ण वाटतं,
तू नसशील तर काहीच अपूर्ण वाटतं. ❤️
तुझ्या हास्यात माझं जग दडलंय,
तुझ्या आठवणीत मन हरवलंय,
कळत नाही कसं सांगू तुला,
माझं प्रत्येक स्वप्न तुझ्यावरच जडलंय.
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं
कॉलेज काट्याकडे पाहून
फक्त एकदाच ती हसली
आणि प्रत्येकालाच वाटलं
ती आपल्या जाळ्यात फसली
तारेवरची कसरत
मी तारेशिवाय करतो
जरा तोल जातोय असं वाटलं की
लगेच तुझा हात धरतो
खुप काही बोलायचय
खुप काही ऐकायचय,
उरल-सुरल आयुष्य
माझ आनंदात घालवायचय.
रानपाखारांची किलबिल
आजवर कधी कळलीच नाही,
कारण तू सोबत असताना
मी ती कधी ऐकलीच नाही
खरे प्रेम दर्शवणाऱ्या चारोळ्या
प्रेम म्हणजे फक्त बोलणं नसतं,
ते मनापासून जाणवणं असतं,
साथ देणं प्रत्येक परिस्थितीत,
हेच खरं प्रेमाचं लक्षण असतं.💖
तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे,
तुझ्या आनंदातच माझं सुख आहे,
तू हसत राहा नेहमी असंच,
कारण तुझं हसणंच माझं जग आहे.
काल रात्री म्हणे
गावात गोंधळ मजला होता
जमिनीवरचा चंद्र पाहून
आकाशातील चंद्र लाजला होता
आवडेल मलाही पाऊस व्हायला
न सांगता तुझ्या भेटीला यायला
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला
मी ही असच लिहावं
तू ही असच वाचावं
माझ्या हृदयातील भाव
तुला शब्दातून कळावं
कधीतरी भेटशील न तेव्हा बोलत जा,
नात्यांच्या तराजूत मलाही तोलत जा
दिवसराञ करतो विचार तुझा,
श्वासात दरवळतो गंध तुझा
तुझ्या ओठांवर ओठ टेकण्याचा
आहे नवा छंद माझा
आज काल वाटेवरचा मोगराही
नेहमीसारखा फुलत नाही
कदाचित त्यालाही समजले असेल की
तू माझ्याशी बोलत नाही
Marathi Prem Kavita Charolya
तुझे काय ते तुला माहित माझे प्रेम खरे होते
तुला ओळखता नाही आले मी तर सर्वस्व तुला वाहिले होते
तू स्वतः बद्दल किती महत्त्वाचं सांगून गेलीस
माझ्याबद्दल ऐकायच विसरून गेलीस
माझं हृदय तर घेऊन गेलीसच पण
तुझं मात्र द्यायचं विसरून गेलीस
तिच्या पाणावलेल्या डोळ्यात मला अनेक प्रश्न दिसतात
आणि तेच प्रश्न मला प्रेमरूपी कोड्यात टाकतात
तुझा स्पर्श मला नवीनच जाणवला
कधीतरी सांडून पुन्हा नव्याने गावलेला
मरण असेल तर ते तुझ्या मिठीत असावं
नाहीतर आयुष्य जगणं तुझ्यासोबत असावं
Marathi Charoli On Love
तुझ्या आठवणीत माझ्या कित्येक रात्री जागत गेल्या
आणि त्या सुद्धा मला माझं प्रेम मागत गेल्या
प्रेम करावं डोळसपणे त्यात नको घाई
फसवणूक झालीच तर त्याला ग्राहकमंचच नाही
चेहरा कितीही लपवला तरी डोळे लपवता येत नाही
प्रेम कितीही लपवलं तरी डोळे ते लपवत नाही
प्रेम तुझे जपताना होतोय खूप त्रास
मिटल्या पापणीत का बरे होतोय तुझाच भास
Marathi Prem Charolya
माझ्यापासून तुझ्यापर्यंतच अंतर जवळ वाटलं
तुझ्याकडे धाव घेतली तर ते फार लांब वाटलं
खरी जरी असेल प्रीत तुझी का केली नाही तू व्यक्त
सदा वाट बघण्यात तुझी आटले माझ्या देहाचे रक्त
तू पाहता क्षणी मजला काळजाचे ठोके चुकले
लाजेचा पडदा येता मधे डोळे माझे आपोआप झुकले
खरे प्रेम दूरदर्शन सारखे असत कधीही नं बदलणारं
लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी आपल्याच विश्वात रमणार
प्रेम म्हणजे काय असतं? सागरात पडल्यावरही घाबरायचं नसतं
कितीही पोहता येत असलं तरीही आकंठ बुडून जायचं असतं
Charoli in Marathi on Love
दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित उन पडतं
तसंच काहीसं पाऊल नं वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं
आज तू पुन्हा प्रेमाची जाणीव करून दिलीस
जे कधी माझ्या नशिबातून हरवले होते
आज तेच प्रेम तू सावरून घेऊन आलीस
झपाटलं आता मनाला भिनलंय प्रेमाचं वारं
बघा पाणीही गोड झालं अरबी समुद्राचं सारं
वाट बघाया लागलो उघडून दही दारं
माझा मी नं उरलो आता तुज देऊन टाकलं सारं
वाहणाऱ्या मनाला थांबवणारं
भरकटलेल्या जीवनाला दिशा देणारं
कोणीतरी आपलं असावं
डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्येक्षातही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर हे नं सांगताही जाण
Marathi Charolya On Love
जेव्हा देशावरचे स्पर्श मनापर्यंत पोहोचतात
मला वाटतं तेव्हा कवितेचे नावे शब्द सुचतात
तो म्हणायचा लगेच जायचं असेल तर येऊच नकोस
आणि ती मनात म्हणायची जायला निघाले तरी मला जाऊ देऊच नकोस
माझाच वाद असे माझ्याशी तुला काळजी नाही कशाची
मी बसलो एकटा जरी तू मात्र कधी दूर नसायची
का करतेस विचार ग सखे वावटळीने भरलेल्या भूतकाळाचा
ढळून आनंदाचे अश्रू तू स्वीकार कर नव्या जीवनाचा
निरर्थक गोष्टींवरून तुझं माझं भांडण व्हायचंच
आयुष्य मात्र सगळं विसरून पुन्हा एकत्र होऊन जगायचं
चंद्राच्या रूपात मला तुझं मनमोहक रूप दिसावं
माझं मन त्यात मग तुकडा तुकडा फसावं
Marathi Charolya Premachya
वाट तुझी बघत असतं रोजच कुणीतरी
तुझ्यासाठी जगत असतं आस लावून प्रत्येक क्षणी
तू जवळ नसल्यावर वाटतं तुझ्यासोबत खूप काही बोलावसं
पण तू समोर येताच फक्त तुला पाहावंसं वाटतं
तुझ्या नुसत्या भासाने श्वास सुसाट धावतात माझे
मनी फक्त आस तुझी जवळ आठवणींचे ओझे
तू नुसतं मला पाहिलंस तरी चेहऱ्यावर किती हसू उमटलं
दोन शब्दच नुसतं बोललीस तरी मनात पुन्हा प्रेम दाटलं
तू समोर असलीस की मला काहीच सुचत नाही
तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाच मला रुचत नाही
प्रेमावर मराठी चारोळ्या
प्रेम ही भावना शब्दांत मांडणे सोपं नसतं, पण चारोळ्यांच्या माध्यमातून ती अत्यंत सुंदरपणे व्यक्त करता येते. प्रेमात असलेली ओढ, काळजी, जिव्हाळा आणि भावना – या सगळ्यांना शब्दांची गोड साथ मिळाली की ते अधिक खास बनतं. येथे आम्ही तुमच्यासाठी खास “प्रेमावर मराठी चारोळ्या” (Marathi Charolya on Love) घेऊन आलो आहोत, ज्या तुमच्या मनातील भावना सहजपणे व्यक्त करतील.
प्रेमावर मराठी चारोळ्या या केवळ शब्दांचा खेळ नसून, त्या हृदयातील भावना व्यक्त करण्याचं एक सुंदर माध्यम आहेत. या चारोळ्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं प्रेम अधिक खास पद्धतीने व्यक्त करू शकता.
जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला काही खास सांगायचं असेल, तर या चारोळ्या नक्कीच उपयोगी ठरतील. अशाच सुंदर, रोमँटिक आणि हृदयस्पर्शी मराठी चारोळ्यांसाठी आमच्या वेबसाइटला भेट देत राहा आणि तुमच्या प्रेमाला शब्दांची सुंदर भेट द्या! 💕
प्रेम म्हणजे केवळ एक भावना नाही, तर ती आयुष्याला अर्थ देणारी एक शक्ती आहे. कधी ते हसवतं, कधी रडवतं, पण प्रत्येक वेळी काहीतरी शिकवून जातं. या चारोळ्या तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत तुमचं मन पोहोचवायला मदत करतील. तुम्ही या चारोळ्या WhatsApp स्टेटस, Instagram कॅप्शन किंवा खास मेसेज म्हणून वापरू शकता.
