Marathi Political Jokes

पक्षश्रेष्ठी – बी एम डब्ल्यू
खासदार – मर्सिडिस
आमदार – टोयोटा फॉर्च्युनर
नगरसेवक – टोयोटा इनोव्हा
सरपंच- जुनी बोलेरो / टाटा सुमो
ग्राम सदस्य- टाटा नॅनो
कार्यकर्ता- तु १० बघ माझ्याकड २० आहेत ३० रुपयाचं पेट्रोल टाकू


अमेरिकेच्या प्रेसिडेन्टला व्हाइट हाऊस पेंट करायचे होतं. त्यांनी निविदा मागवल्या
चीनच्या कारागिराने ३ कोटि सांगितले, यूरोपच्या कारागिराने ७ कोटी सांगितले आणी भारताच्या करागिराने १० कोटी सांगितले…
त्यावर प्रेसिडेन्टने चीनच्या माणसाला विचारले तू ३ कोटी का मागितले? तो म्हणाला १ कोटींचा कलर,१ कोटींचा कामगार खर्च आणि १ कोटी नफा….
मग यूरोपच्या कारागिराची वेळ. तो म्हणाला ३ कोटी चा कलर, २ कोटी कामगार खर्च आणि २ कोटी नफा….
आणी मग भारतीय व्यक्तीला विचारले तर तो म्हणाला ४ कोटी तुम्हाला, ३ कोटी मला, आणि ३ कोटी त्या चीनच्या व्यक्तिला जो कलर करणार आहे
भारतीय व्यक्तीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळाले


नवरा-बायको रात्री झोपले… एकदम गप्प होते… एकमेकांमध्ये काहिच बोलणं नाही..
बायकोच्या मनात विचार येऊ लागले..
१. हे माझ्याशी का बोलत नाही?
२. मी पहिल्यापेक्षा आता सुंदर दिसत नाही का?
३. माझं वजन तर नाही ना वाढलं?
४. माझ्या चेहऱ्यावर आढया तर नाही ना आल्या?
५. यांच्या जीवनात कोणी नवीन तर नाही आली?
आणि नवरा बिचारा एकाच विचारात
मुंबईत परत युती होईल का?


मनोज : ती समोरच्या बंगल्यात जी नवीन मुलगी राहायला आलीय ना ती “आम आदमी” पार्टीची मेंबर आहे
बायको : तुम्हाला कसे माहित?
मनोज : आज सकाळी मी तिला “हात” दाखवला… तर तिने मला “झाडू” दाखवला


राजकारणात नेते एकमेकांचे गुप्त मित्र असतात आणि कार्यकर्ते उघड शत्रू!


जन सेवक : बस कंडक्टर, सेवा – 32 वर्षे पण पेन्शन – १५०० रूपये महिना
जन सेवक : आमदार, सेवा – 5 वर्षे आणि पेन्शन – ५०००० रूपये महिना
एक सतत ऊभा राहतो आणि दुसरा एकदाच ऊभा राहतो


जेवढा जीव तोडून नगरसेवकाचा प्रचार करतोस तेवढा जीव तोडून अभ्यास केला असतास तर आज याच महापालिकेत आयुक्त झाला असतास – एक भडकलेला बाप


मी काय म्हणतो – आपले आमदार आज पगार वाढवण्यासाठी एकत्र आलेत…
उद्या म्हणतील आम्हाला पर्मनन्ट करा !


Marathi Politician Jokes


पाकिस्तानी राजकीय नेते सतत ओरडत आहेत की ” आम्ही हिंदुस्तानच्या ताब्यातून पूर्ण काश्मीर घेऊ”
अरे इथे आम्ही आमच्या वर्गातील पोरगी दुसऱ्या वर्गातल्या पोराला पटवू देत नाही, आणि हे काश्मीर मागतायेत ! ! !


काही कार्यकर्ते स्टेजवर बसलेल्या नेत्याच्या पाठीमागून जाऊन कानात विचारतात, “साहेब काही चहा कॉफी मागवू का ?”
आणि नंतर फेसबुकवर फोटो टाकून फोटोखाली लिहितात, “नेत्यांसोबत चर्चा करताना भाऊ…”


सकाळी मंत्री महोदयांनी वृक्षारोपण केले
दुपारी बकरीने वृक्ष खाऊन टाकले
संध्याकाळी मंत्री साहेबांनी बकरी खाल्ली
मार्च एंडिंग – हिशोब पूर्ण


पुढारी (डॉक्टरांना): माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सांगा !
डॉक्टर : आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळयासारखा वाढत आहे…
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत …
उजवी कडील किडनीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे …
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे… त्यामुळे
रक्तवाहिन्यांमध्ये रस्ता रोको आंदोलन चालू झालेले आहे…
मज्जासंस्था सुद्धा आपला पाठींबा काढून घेण्याच्या मार्गावर आहेत …
या साऱ्या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्ष श्रेष्टींवर पडत आहे … त्यामुळे
ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहे


 


Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *