Marathi Paus Rain Charolya

Paus Rain Charolya

ओले त्या धुंद क्षणांची
सर आठवणींची ओली
ओंजळीत मी धरलेला
पाऊस तुझा मखमली


आठवणींचा पाऊस नेमका
तुझ्या घरापाशी बरसतो
माझा वेडा चातक पक्षी इथे
एका थेंबासाठी तरसतो


कोसळणारा पाऊस पाहून
मला एक प्रश्न पडतो
माझे तर ठीक आहे
पण हा कोणासाठी रडतो


रात्री वारा सुटलेला
आणि पाऊस पडत होता
सहज वर पहिले तर चक्क
चंद्र रडत होता


माझी कहाणी ऐकून तोही रडला
लोक वेडी म्हणतात पाऊस कसा पडला?


रोमँटिक पावसाच्या चारोळ्या


तुझ्यासोबत भिजायचं होतं पावसात,
हातात हात घेऊन चालायचं होतं रस्त्यात,
प्रत्येक थेंबात तुझीच आठवण यावी,
असंच काहीसं स्वप्न होतं मनात. 🌧️


आभाळ बरसताना बोलू नये
आभाळ फक्त पाहत राहवं
भिजता आलं नाही तरी
मनोमन नाहत राहवं


पावसाचे थेंब आणि मनाचे खेळ,
कधी हसू तर कधी आठवणींचा मेळ,
भिजतं शरीर पावसात,
पण मन मात्र हरवतं तुझ्या आठवणीत खोल.


जगभरून फिरून पाऊस
नेमका तुझ्या घरापाशी बरसतो
मूर्ख चातक पक्षी
इथे एका थेंबासाठी तारसतो


काळे ढग दाटून येतात,
थेंब-थेंब पाऊस बरसतो,
मातीचा सुगंध दरवळतो,
मनाला एक वेगळंच समाधान मिळतं.


निसर्गावर आधारित पावसाच्या चारोळ्या


पावसात भिजलेली धरती हसते,
निसर्गाची सुंदरता खुलून दिसते,
प्रत्येक थेंबात जादू असते,
जी मनाला नव्या ऊर्जेने भरते. ☁️


ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला
मंद मंद असा सुवास आहे
आजही आठवतोय तो पाऊस
अडकलेला ज्यामध्ये माझा श्वास आहे


आत्ता पाऊस येईल आणि
भिजून जाईल गाव
आणि कुठल्यातरी थेंबावर
माझंही असेल नाव
(कवी : चंद्रशेखर गोखले)


पावसाची गोष्ट पाऊस रात्रभर सांगत राहिला
आणि घरामागचा डोह दुथडी भरून वाहिला
(कवी : चंद्रशेखर गोखले)


मी ओंजळीत पाऊस भरतो आणि तुझ्याकडे पाठवतो
पाऊस म्हटलं कि मला हा एकच उद्योग आठवतो
(कवी : चंद्रशेखर गोखले)


पाऊस पडायच्या आधी मला पाऊसाच स्वप्न पडतं
आणि मग पुढे एक दोन दिवस माझं कामावरच लक्ष उडतं
(कवी : चंद्रशेखर गोखले)


आठवणारा पाऊस हा कोसळणाऱ्या पाऊसापेक्षा वेगळा असतो
त्या पाऊसात कसा मी चिंब चिंब भिजताना दिसतो
(कवी : चंद्रशेखर गोखले)


पावसाचा आस आहे माझ्या तहानलेल्या मनाला
कोणाची वाट बघतोस विचारल्यावर काय सांगत बसू कोणाला ?
(कवी : चंद्रशेखर गोखले)


Marathi Rain Charolya


एक हरवलेला पाऊस
मी शोधत राहतो अजूनही
म्हणून मी कोरडा राहतो
प्रत्येक पावसात भिजुनही


पावसाच्या सरीनंतर
भिजून गेलं रान
आणि माझ्या हाती राहिलं
लाजाळूचं पान


पावसावर मराठी चारोळ्या

पाऊस म्हणजे केवळ निसर्गाची देणगी नाही, तर तो भावनांचा एक सुंदर उत्सव आहे. पावसाच्या सरींसोबत आठवणी जाग्या होतात, मनात एक वेगळीच शांती आणि आनंद निर्माण होतो. कधी तो प्रेमाची चाहूल देतो, तर कधी जुन्या आठवणींमध्ये हरवून टाकतो. अशा या पावसाच्या भावनांना शब्दांत मांडण्यासाठी “पावसावर मराठी चारोळ्या” (Marathi Charolya on Rain) हा एक सुंदर मार्ग आहे.

पावसाच्या प्रत्येक थेंबात काहीतरी खास असतं—कधी तो मनाला शांत करतो, तर कधी प्रेमाची गोड जाणीव करून देतो. या चारोळ्या तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य ठरतील. तुम्ही या चारोळ्या सोशल मीडियावर शेअर करू शकता किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवू शकता.

पावसावर मराठी चारोळ्या या केवळ शब्द नसून, त्या मनातील भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहेत. पाऊस आणि भावना यांचा एक अनोखा संबंध आहे, जो प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी खास स्थान ठेवतो.

या चारोळ्यांद्वारे तुम्ही तुमच्या भावना सहज व्यक्त करू शकता आणि पावसाचा आनंद अधिक खास बनवू शकता.

पाऊस पडत राहू दे… आणि तुमच्या आयुष्यात आनंदाच्या सरीही असाच बरसत राहू दे! 🌈💙