Marathi Farmer Jokes

एक शेतकरी एका साहेबांशी बोलतां बोलतां गायछाप काढली मळु लागला
साहेब म्हणाला, कमी खात जा तंबाखू कॅन्सर होतो त्यातल्या निकोटीनमुळे
शेतकरी : आवं साहेब, तंबाखू मळुन थोपटली की त्यातलं निकोटीन उडुन जातयं, तुम्हाला म्हाईत न्हाय व्हय?


आता तर हद्दच झाली राव… एका मित्राला कॉल केला तर कॉलर ट्यून वाजली,
ज्या वक्तीला आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात तो आता गायछाप मळत आहे
कृपया चुना लवोस्तवर दम काढा


एक शेतकरी खूप आजारी असतो. त्याची पत्नी त्याला म्हणते : तुमचा ताप वाढतच चाललाय, थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते.
खुराड्यातला कोंबडा जागा होतो आणि म्हणतो : ओ ताई, आधी क्रोसीन तर देऊन पहा. लगेच काय चिकन सूप ??


जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच मजा असते. पेशेंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव लिहितात व त्याचे समोर जनावरांना झालेल्या आजाराचे नाव लिहिलेले असते. परवा असेच दवाखान्यात गेलो असता रजिस्टर वर लिहिलेले दिसले
नाव : गणपतराव पाटील
आजार : गाभण रहात नाही


शेतकऱ्याचा मुलगा मुंबईला शिकायला जातो. काही दिवसांनंतर घरी पात्र पाठवतो –
प्रिय बाबा
स. न. वि. वि.
मी इथे मजेत आहे. कॉलेजला जातो पण मला वाईट वाटते की माझे सारे मित्र रोज लोकल ट्रेनने येतात आणि मी आपले Scorpio मधून जातो…
बाबांचे उत्तर आले – प्रिय पक्या, वाईट वाटून घेऊ नकोस. सकाळीच पैसे पाठवतो. लोकल ट्रेन घेऊन टाक, कुठेही कमी पडायचे नाय
होईल तोटा…. पण शेतकरी आहे मोठा


 

Liked it? Share with your friends...

One thought on “Marathi Farmer Jokes

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *