Marathi Charolya on Life

जातीपातीच्या धुळवडीत जिवंतपणी रंगून गेले
मेल्यावार मात्र सगळ्यांचे एकाच रंगाचे कावळे झाले


छोटंसंच आयुष्य आहे ते हसत खेळत जगायचं
मागचं दुःख विसरायचं अन पुढचं सुख पाहायचं


असं कधीच नाही होणार आपण एकमेकांशिवाय जगणार
कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला दुसऱ्या शब्दाची मदत घ्यावीच लागणार


आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?


आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा
आयुष्यात एकदा इतकं कडक उन पाडाव की जवळच्या सावल्यांचे महत्त्व कळावे
आयुष्यात एकदा इतकी जबरदस्त थंडी पडावी की सगळी दुःख गोठून जावी
आयुष्यात एकदा पुन्हा शाळा आशी भरावी की प्रत्येकाला त्याचे बालपण लक्षात राहावे
आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज कळावी


तीन पनाच एक पुस्तक असतं, पाहिलं आणि शेवटचं पान देवाने लिहिलेलं असतं
पाहिलं पान म्हणजे “जन्म”, शेवटचं पान म्हणजे “मृत्यू”
उरलेलं मधलं पान मात्र आपल्यालाच भरायचं असतं
त्यासाठी मनात प्रेम भाव आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचं असतं


रात्र रात्र सोसलेलं असं थोडक्यात कसं मांडू
आयुष्यभराच दुःख हे चार ओळीत कसं मांडू ?


आयुष्य एकाकी असले तरी अर्थपूर्ण तरी असावं
सोबतीला कुणीच नसलं तरी सोबत करण्यासाठी असावं


Marathi Life Charolya


एवढ्याश्या आयुष्यात खूप काही हवं असतं
पण हवं असतं तेच मिळत नसतं
हवं तेच मिळालं तरी खूप काही कमी असतं
चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ रिकामं असतं


 

Liked it? Share with your friends...

4 thoughts on “Marathi Charolya on Life

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *