
वेळ जीवनात
सर्व काही शिकवत असते
आणि जे वेळ शिकवते
ते दुसरं कुणीच शिकवत नसते
कुणी सत्तर वर्ष जगतो
तर कुणी तिशीतच जातो
जो दुसऱ्यांसाठी जगतो
शेवटी तोच लक्षात राहतो
जातीपातीच्या धुळवडीत
जिवंतपणी रंगून गेले
मेल्यावार मात्र सगळ्यांचे
एकाच रंगाचे कावळे झाले
छोटंसंच आयुष्य आहे
ते हसत खेळत जगायचं
मागचं दुःख विसरायचं
अन पुढचं सुख पाहायचं
असं कधीच नाही होणार
आपण एकमेकांशिवाय जगणार
कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला
दुसऱ्या शब्दाची मदत घ्यावीच लागणार
आता जगायचे असे
माझे किती क्षण राहिले?
माझ्या धुळीचे शेवटी
येथे किती कण राहिले?
आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा
आयुष्यात एकदा इतकं कडक उन पाडाव की जवळच्या सावल्यांचे महत्त्व कळावे
आयुष्यात एकदा इतकी जबरदस्त थंडी पडावी की सगळी दुःख गोठून जावी
आयुष्यात एकदा पुन्हा शाळा आशी भरावी की प्रत्येकाला त्याचे बालपण लक्षात राहावे
आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज कळावी
तीन पनाच एक पुस्तक असतं, पाहिलं आणि शेवटचं पान देवाने लिहिलेलं असतं
पाहिलं पान म्हणजे “जन्म”, शेवटचं पान म्हणजे “मृत्यू”
उरलेलं मधलं पान मात्र आपल्यालाच भरायचं असतं
त्यासाठी मनात प्रेम भाव आणि चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचं असतं
रात्र रात्र सोसलेलं
असं थोडक्यात कसं मांडू
आयुष्यभराच दुःख
हे चार ओळीत कसं मांडू ?
आयुष्य एकाकी असले
तरी अर्थपूर्ण तरी असावं
सोबतीला कुणीच नसलं
तरी सोबत करण्यासाठी असावं
Marathi Jeevan Charolya
एवढ्याश्या आयुष्यात खूप काही हवं असतं
पण हवं असतं तेच मिळत नसतं
हवं तेच मिळालं तरी खूप काही कमी असतं
चांदण्यांनी भरून सुद्धा आपलं आभाळ रिकामं असतं
जीवनावर मराठी चारोळ्या
जीवन म्हणजे अनुभवांची, भावनांची आणि शिकण्याची एक सुंदर सफर. कधी आनंद, कधी दु:ख, कधी यश, तर कधी अपयश – या सगळ्यांतून आपण अधिक मजबूत होत जातो. अशा या जीवन प्रवासाला शब्दांची साथ मिळाली की ते अधिक अर्थपूर्ण वाटते. येथे आम्ही तुमच्यासाठी खास जीवनावर आधारित मराठी चारोळ्यांचा (Marathi Charolya on Life) संग्रह घेऊन आलो आहोत, जो तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल.
जीवनातील प्रत्येक क्षण काहीतरी शिकवून जातो. कधी परिस्थिती कठीण असते, पण त्या क्षणांमध्येच आपली खरी ताकद दिसून येते. या चारोळ्या तुम्हाला प्रेरणा देतील, सकारात्मक विचार करायला मदत करतील आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतील.
जीवनावर आधारित मराठी चारोळ्या आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहेत. त्या केवळ शब्द नसून, आपल्या अनुभवांचे प्रतिबिंब असतात. तुम्ही या चारोळ्या सोशल मीडियावर शेअर करू शकता, स्टेटस म्हणून वापरू शकता किंवा स्वतःसाठी प्रेरणा म्हणून जपू शकता.
जीवन सुंदर आहे—फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा! ✨
