Manmandira Tejane Song Lyrics in Marathi

मनमंदिरा तेजाने उजळून घेई साधका
संवेदना संवादे सहवेदना जपताना

तळहाताच्या रेषांनी
सहज सुखा का भोगी कुणी
स्वयंप्रकाशी तू तारा
चैतन्याचा गाभारा
भर पंखातून स्वप्‍न उद्याचे
झेप घे रे पांखरा

उजळून घेई साधका
मनमंदिरा तेजाने उजळून घेई साधका

गीत – मंदार चोळकर
संगीत – शंकर-एहसान-लॉय
स्वर – शंकर महादेवन
चित्रपट – कट्यार काळजात घुसली