Man Udhan Varyache Song Lyrics in Marathi

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वा-याचे, गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वा-याचे……

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते बावरते झडते अडखळते का पडते?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होवून पाण्यावरती फिरते
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते

मन उधाण वा-याचे, गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वा-याचे……

रुणझूणते गुणगुणते कधी गुंतते हरवते
कधी गही-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे तरी भासांच्या मागुनी पळते

मन उधाण वा-याचे, गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वा-याचे……

चित्रपट -अगं बाई अरेच्चा
गीतकार – गुरु ठाकूर
संगीत – अजय-अतुल
गायक- शंकर महादेवन