तुमच्याकडे पाऊस आहे काय?
मुंबईकर : खूप….
पुणेकर : प्रचंड….
सिंधुदुर्गकर : मरणाचो
थोडक्यात हरलो….
मालवणीत सांगूचा झाला तर,
जग फिरान इलो आनी उंबऱ्यावर आपटान मेलो
बाई : अरे एवढे दिवस खय होतस रे शाळेत नाय इलस तो?
बंड्या : बाई माका बर्ड फ्लू झालो हुतो ना, म्हणून मी इलय नाय शाळेत
बाई : पण यो तं पक्ष्यांका होता ना, तुका कसो झालो रे?
बंड्या : गे तु कधी माका माणसात मोजलस? बगुचा तेव्हा माका कोंबडो बनवुन बाहेर उभी करतस
बंड्याची गर्लफ्रेंड : जानू उद्या माझो Birthday आसा
बंड्या : डार्लिंग, ऍडव्हान्स मदेन तुका Happy Birthday
बंड्याची गर्लफ्रेंड : GIFT काय दितलस?
बंड्या : बोल तुका काय होया?
बंड्याची गर्लफ्रेंड : रिंग
बंड्या : ठीक आसा, RING दितलय, पण call उचलु नकोस, आधीच BALANCE कमी आसा
Malvani माणूस: ओ पुजाऱ्यानु, यंदाच माझी “बायपास” झाली असा. तो नवस फेडायला मी आज मंदिरात इलंय. जरा देवाक जोरदार गाऱ्हाणा होऊन जाऊ द्या
पुजारी: बा देवा महाराजा, यांची `बाय’ यंदा ‘पास’ झाली असा. तशी ती दरवर्षाक होऊ दे रे महाराजा
Malvani Language Jokes
ही दुनिया गोल आसा.. पुरावो होयो?
झुरळ उंदराक घाबरता,
उंदिर मांजराक घाबरता,
मांजार कुत्र्याक घाबारता,
कुत्रो माणसाक घाबारता,
माणुस आपल्या बायकोक घाबारता,
आणि बायको झुरळाक !
(ह्या चक्र असाच फिरत रवता)
Malvan एअरवेज मधली हवाई सूंदरी एका पॅसेंजराक ईचारता: सर, आपण जेवणात काय घेतालास?
पॅसेंजर: कांद्याची भजी, वाटाण्याची उसळ, वडे, भोपळ्याची भाजी, कोशिंबीर डाळ भात आणि खीर
हवाई सूंदरी: सर, आपण ईमानात आसास. आपल्या बापाशीच्या श्राद्धाचा ज्यावान जेवूक नाय इलात
मोरूची बायको मोरूक ईचारता : बघलास शिलाचो नवरो रोज संध्याकाळी तीका फिराक घेऊन जाता, तुम्ही असा कधी केलास?
मोरू : मी तीका तीन चार येळेकं ईचारलय, पण ती नाय म्हणता.
मास्तर: मोरू, शहामृगाची मान लांब का असते?
मोरू: गुरुजी, तेचा डोक्या आणि शरीर हेच्यात खूपच अंतर असता म्हणान तेंका जोडूच्यासाठी तेची मान पण लांब असता.
मालवणी जोक्स
बाबा: काय रे, आज परीक्षा होती ना? शाळेत जावक नाय तो?
गणा: पेपर खुपच कठीण होतो बाबानू.
बाबा: तू परीक्षेकच जावक नाय आणि तुका कसा कळला?
गणा: पेपर कालच फुटलोलो बाबानू, मी वाचून तेवाच मी समाजलय ह्या काय आपल्याक जमाचा नाय.
रोज दवाखान्याच्या भायर उभो दिसणाऱ्या मोरूक देशपांडे डॉक्टरीण बाई एक दिवस आत बोलवता.
देशपांडे: काय रे, रोज तिथे उभा राहून दवाखान्यातल्या बायकांना बघत राहतोस, लाज नाही वाटत? बेशरम.
मोरू: बाईनू तुम्हीच भायर बोर्ड लीवन ठेवलास “स्त्रियांना पहाण्याची वेळ स.९ ते ११.”
मावशेच्या दारात भिकारी येता.
भिकारी: मावशे, भाकरी वाढ गे बाय
मावशी: अरे, भाकरी अजून जावक नाय रे बाबा, मगे थोड्या वेळान ये
भिकारी: माजो मोबाईल नंबर लीवन घे आणि भाकरी झाली काय मिस्ड कॉल दी
मावशी: तसा कित्या? भाकरी झाली काय माझा फेसबुक अपडेट करतंय, ता बघ आणि ये
Birthday Wishes in Malvani Language
तर बा देवा महाराजा…
आज माझ्या दोस्ताचो वाढदिवस असा महाराजा…
तेवा देवा महाराजा, तेंका उदंड आयुष्य दी…
दिवसेंदिवस सदैव त्याची भरभराट होऊ दे….. होय महाराजा!
त्याचो तू सांभाळ कर आणि जी काय इडा, पीडा, वाकडा, नाकडा आसात ता दूर कर रे महाराजा….
आणि तुझी कृपादृष्टी कायमची माझ्या मित्रावर असुदे महाराजा…
होय देवा महाराजा🙏
माझ्या सगो मित्रास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…💐💐
ऐकान घी, तुका ……. वरसुनच शुभेच्छा देतंय ते गुपचाप मानून घे..
नम्र विनंती करतय, जो काय केक, चॉकलेट वाटणार हंस तो घराकडे गुमान पाठवून दी 😊
गजाली करूक भेट कधीतरी सवड काढून..
पुन्हा तुका वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्य लाभो हो देवा महाराजा कडे पार्थना🙏
आज माझ्या जिवाभावाच्या मित्राचो वाढदिवस…
माझो सुखदुःखातील नेहमीचो च सवंगडी.
वाढदिवसाच्या निमीत्ताने देवाकडे सांगना करतय..
तेका सुखी आणि उदंड आयुष्य दी, आणि नेहमी भवानी माते पदराखाली ठेव🙏
Malvani Status
एकटो बापूस चार झीलांका सांभाळता… पण चार झिल मिळानं एकट्या बापशीक सांभाळू शकतन नाय