Mala Ved Lagle Premache Song Lyrics in Marathi

रंगबावर्‍या स्वप्‍नांना सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे

नादावले धुंदावले, कधी गुंतले मन बावळे
नकळे कसे कोणामुळे सूर लागले मनमोकळे
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटला माझा मला
खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे

गीत – गुरु ठाकूर
संगीत – चिनार – महेश
स्वर – स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर
चित्रपट – टाईमपास