Latest Marathi Ukhane

माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा,
…. रावांनी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा


Facebook वर ओळख झाली आणि WhatsApp वर प्रेम जुळले
.… राव आहेत खरंच बिनकामी हे लग्न झाल्यानंतर कळले


…. च्या येण्यानी घडलं माझे जीवन
तुमच्यावर खुप प्रेम करते, तुमच्यासाठी काय पण


आंब्याच्या झाडाला लागली होती मिर्ची
तू माझा परश्या आणि मी तुझी आर्ची


आहे चैत्र-वैशाख महिना, सुरात कोकिळा गाते
…. रावांचे नाव …. घेते


काव्य आणि कविता सागर आणि सरिता
…. रावांचे नाव घेते तुमच्या करीता


Marathi Ukhane New


नवरातत्रीनंतर येतोय दसरा,
…. रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा


 चंदनी पानात मुग्ध कळी हसली
…रावांच्या प्रेमात मी नकळत फसली


 श्रावणात पडतात सरीवर सरी
…. रावांचे नाव घेते …. ही बावरी


 ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल
…. रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल


 मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ,
…. रावांमुळे आला माझ्या जीवनाला अर्थ


Latest Marathi Ukhane


पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
…. राव आहेत आमचे फार नाजुक


सूपभर सुपारी निवडू कशी, गळ्यात माळ वाकु कशी, पायात पैंजण चालू कशी,
…. राव बसले मित्रपाशी, कपाटाची चावी मागू कशी??


 परसात अंगण अंगणात तुळस
…. रावांचे नाव घ्यायचा मला नाही आळस


 रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात,
….. चे नाव घेते असु द्या लक्षात


 साजुक तुपात, नाजुक चमचा
…. रावांचे नाव घेते आशीर्वाद असुदे तुमचा


Latest New Ukhane in Marathi


 नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू
…. रावांचे नाव घ्यायला मी कशाला लाजू


 नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
…. रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर


Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *