Lai Bhari Puneri Patya

चहा घेत असताना तुमच्या खाजगी गोष्टी हळू आवाजात बोला आमच्या कपाला कान आहे

चहा घेत असताना तुमच्या खाजगी गोष्टी हळू आवाजात बोला
आमच्या कपाला कान आहे


कार्यभाग उरकला की पुरावे नष्ट करा!

पुरावे नष्ट करा Puneri Patya


मी गाढव आहे!
मला “नो पार्किंग” चा बोर्ड दिसत नाही मी इथेच गाडी लावणार,
स्थानिकांना त्रास झाला तरी चालेल

नो पार्किंग Puneri Pati


आम्ही १ ते ४ सुद्धा चालू असतो

1 ते 4 चालू असतो Puneri Patya


दरवाजा आत ढकलावा!
उगाच खेचून आपलं शक्ती प्रदर्शन करू नये

दरवाजा आत ढकलावा Puneri Pati


दुकानात बसून ऑनलाईन प्रोडक्ट सर्च करण्यास सक्त मनाई आहे

प्रोडक्ट सर्च Puneri Patya


फुकटच्या फुलांनी देव पूजा केल्यास स्वर्ग प्राप्त होत नाही

स्वर्ग प्राप्त होत नाही Puneri Pati


दोघात एक मिसळ खाल्यास प्रेम वाढते तसेच
३०/- रुपये एक्सट्रा सुद्धा वाढतात

दोघात एक मिसळ Puneri Patya


नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणताही छोटा मोठा
उद्योगधंदा चालू करावा म्हणजे पास झालेल्यांना काम मिळेल

छोटा मोठा उद्योगधंदा Puneri Pati


इतरांना आपल्यामुळे त्रास झाला तर आपल्यालाही इतरांमुळे त्रास होऊ शकतो

आपल्यालाही इतरांमुळे त्रास होऊ शकतो Puneri Pati


पाच रुपयांच्या वास्तूसाठी शंभर रुपयाची नोट काढून विनाकारण स्वतःची श्रीमंती दाखवू नये

शंभर रुपयाची नोट Puneri Pati


दवाखान्यात डॉक्टर येईपर्यंत थांबा.
फार घाई असेल तर सरळ वर गेलात तरी चालेल
(डॉक्टर वर राहतात)

डॉक्टर वर राहतात Lai Bhari Puneri Pati


पार्लरच्या बाहेर लावलेली पाटी
“आमच्या इथून निघालेल्या सुंदर मुलीला पाहून शिट्टी वाजवू नये
ती तुमची आजी असू शकते”.

पार्लरच्या बाहेर लावलेली पाटी

 


पुणेरी पाट्या म्हणजे पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी, दुकानांत, रस्त्यांवर किंवा इमारतींवर लावलेल्या विनोदी, उपरोधिक किंवा गंभीर सूचना असलेल्या फलकांना दिलेले नाव आहे. या पाट्या त्यांच्या खुमासदार भाषाशैलीसाठी, थेटपणासाठी आणि कधी कधी उपहासात्मक किंवा तिरकस विनोदासाठी प्रसिद्ध आहेत.

पुणेरी पाट्यांमध्ये सामान्यतः नागरिकांना सूचना, सूचना न पाळल्यास शिक्षा, किंवा आगंतुकांना मजेशीर इशारे दिलेले असतात. उदाहरणार्थ, “इथे थुंकू नये, पकडल्यास दंड केला जाईल” किंवा “चहा मागून त्रास देऊ नये” अशा प्रकारच्या सूचना या पाट्यांमध्ये आढळतात.

पुणेरी पाट्या हे पुण्याच्या खास सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानले जातात आणि त्या पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हमखास हास्य आणतात.