प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।।
ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।।
सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।।
वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।
एक क्षण… पहिला प्रहर, एक क्षण… मेंदीचा बहर, एक क्षण… लगीन घाई, एक क्षण… वाजे सनई,
एक क्षण… अंतरपाठ, एक क्षण… रेशीम गाठ, मुहूर्ताचा हा क्षण जणू काही एक सण…
म्हणूनच हजर रहा… प्रत्येक जण… आग्रहाचे निमंत्रण
ब्रह्म सुतामध्ये गाठ बांधली सात जन्मांची, पृथ्वीतलावर जोडी शोभते xxx व xxx ची
पुर्व जन्माची पुण्याई xxx घराण्याची, कन्या देउनी वाढविली कीर्ती नावाची
पुण्य पवित्र निर्मळ गंगा शंकराची, इंद्राची परी तशी सून शोभते xxx घराण्याची
सगे सोयरे इष्ट मंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाची
माथ्यावरती पडूद्या अक्षता तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची
एका नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोय
कुलस्वामिनीच्या कृपेने, अग्निदेवतांच्या साक्षीने, श्री गणेशाच्या आशीर्वादाने
आणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहेत आपले शुभाशिर्वाद
आपण सर्वांनी यावं हे आग्रहाचे आमंत्रण !
Marathi Lagna Patrika Matter
विवाह ! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं एक जाणीव
एक नव्याने जुळणारी रेशीम गाठ ! एक स्वप्न दोन डोळ्यांचं
एक हुरहूर दोन मनांची, एक पाऊल सात पावलांची । खरंच हा उत्सव तरल भावनांचा
वाट नवी, स्वप्न नवे, स्वप्नाला साथ मिळेल प्रेमाची,
जिवनाच्या वाटेवरती साथ मिळेल सुख दुःखाची,
अखंड राहो ऋणानुबंध यांच्या संसारासाठी गरज आहे आपल्या आशीर्वादाची,
हिच देवाच्या चरणी प्रार्थना आहे XXXXX परिवाराची.
आमचे येथे XXXXX कृपेने हे मंगल कार्य करण्याचे योजिले आहे. तरी वधू वरास शुभाशिर्वाद देण्यास येण्याचे करावे.
ऋणानुबंध ठाऊक नव्हते … एकमेकां शोधित होते । नाते तसे जुनेच होते !
आगमन झाले शुभयोगाचे … नाते जुळते दोन मनांचे । असे हे बंध रेशमाचे !
अथांग हा सागर संसाराचा … विवाह होतोय xxx आणि xxx चा । आशीर्वाद असो मान्यवरांचा !
आपलेपणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीचे आगमन तुमचे !!
Marathi Lagna Patrika Wordings
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन
सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण
यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्षांची सुखद रम्य पाखरण
म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं
दोन पाखरांची भेट निळ्या उंच आभाळी । स्वप्न मनातले त्यांच्या एक घरटं बांधुनी ।।
नव्या पर्वाची, अशी सुरवात दोघांची । ईश्वरचरणी नमन करुनिया ।।
एक सोहळा मोलाचा अन मोलाचं हे नातं । जणू नक्षत्रांचं देणं ह्या प्रिय धर्तीला ।।
चिमणा-चिमणीचा इथं थाटतो संसार । मन भरुनी तुमचे, यांस लाभू द्या आशिर्वाद ।।
Marathi Lagna Patrika Charoli
विश्वा दिली ज्ञानेश्वरी । तुकोबांनी केला संसार पांढरी ।
शिवरायांनी रोवला स्वराज्याचा झेंडा । असा महाराष्ट्र धर्म राजवेडा ।
याच मातीतील अभंग नाती-गोती । XXXX आणि XXXX परिवाराकरिता आपल्या अक्षदा पाडाव्यात
आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान । म्हटले तर दोन जिवांना जोडणारा प्रेमाचा धागा ।।
म्हटले तर अनेक कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध । सात जन्माच्या गाठी जुळवणारा हा सोहळा ।।
आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादाशिवाय अपूर्णच । म्हणूनच या मंगलप्रसंगी आपली उपस्थिती हवीच
लग्न म्हणजे जुळलेले बंध । लग्न म्हणजे नवे अनुबंध ।।
विवाह, सुख दुःखातील आजन्म सोबत, सुरांची साथ, हवीहवीशी संगत
आपला सहभाग क्षणाचा पण आशिर्वाद कायमचा ।या मनस्वी इच्छेने सहपरिवार येऊन नव वधू -वरास शुभशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती
सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची ।
पृथ्वीतलावर जोडी शोभे xxxx – xxxx यांची ।
ईश्वराने गाठ बांधली सात जन्मांची, पूर्व जन्माची पुण्याई xxxx – xxxx घराण्याची ।
सहपरिवारासह येऊन शोभा वाढवावी मंडपाची, वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावा हिच विनंती ।।
सप्तपदींची सात पावलं साताजन्माच्या गाठी
यायलाच हवं तुम्हाला xxxx – xxxx साठी
xxxx कन्या xxxx ची तीन भावंडांत मोठी
xxxx ही घरात मोठा आमची म्हातारपणाची काठी
शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यमध्ये महाराष्ट्राच्या पावन भूमीत मराठमोळ्या वातावरणात ग्रामदेवतेच्या शितल छायेत व कुलदैवत भवानी देवीच्या आशीर्वादाने मिती XX महिना XX शुद्ध पक्ष XX तारीख XX रोजी सायं. XX वेळ XX या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेला आहे, तरी या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत, ह्या साठीच हे आग्रहाचं निमंत्रण!
लग्न पत्रिका मेसेजेस मराठी
भारतीय संस्कृतीत लग्न हा केवळ एक सोहळा नसून दोन कुटुंबांना जोडणारा एक पवित्र बंध असतो. या खास क्षणाची सुरुवात होते ती लग्न पत्रिकेपासून. लग्न पत्रिका म्हणजे आपल्या आनंदाचा पहिला अधिकृत संदेश, जो नातेवाईक, मित्र आणि प्रियजनांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे लग्न पत्रिकेतील मजकूर आकर्षक, भावनिक आणि अर्थपूर्ण असणे खूप महत्त्वाचे आहे.
आजकाल पारंपरिक शैलीसोबतच आधुनिक आणि क्रिएटिव्ह पद्धतीने लग्न पत्रिका लिहिण्याचा ट्रेंड वाढत आहे. अनेक जण आपल्या पत्रिकेत खास मराठी लग्न मेसेजेस वापरून ती अधिक खास आणि लक्षवेधी बनवतात. योग्य शब्दांची निवड हीच आपल्या आनंदाची सुंदर अभिव्यक्ती ठरते.
लग्न पत्रिकेचे महत्त्व
लग्न पत्रिका ही फक्त एक आमंत्रण नसून ती आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची झलक असते. मराठी लग्न पत्रिकेमध्ये सहसा देवाचे आशीर्वाद, शुभमुहूर्त, वधू-वरांची माहिती आणि कुटुंबीयांचे नाव यांचा समावेश असतो. यामध्ये वापरलेले शब्द आपला आदर, प्रेम आणि आनंद व्यक्त करतात.
योग्य लग्न पत्रिका मेसेज निवडताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:
- भाषा साधी आणि समजण्यास सोपी असावी
- संदेश भावनिक आणि मनाला भिडणारा असावा
- पारंपरिक आणि आधुनिक यांचा संतुलित वापर असावा
- वाचकाला आमंत्रण देताना आपुलकी जाणवली पाहिजे
- पारंपरिक व आधुनिक शैलीचा समतोल
मराठी लग्न पत्रिकेमध्ये पारंपरिक शैलीला विशेष स्थान आहे. “श्री गणेशाय नमः” किंवा “शुभमंगल सावधान” यांसारख्या शुभ वाक्यांनी पत्रिकेची सुरुवात केली जाते. यामुळे पत्रिकेला एक धार्मिक आणि सकारात्मक सुरुवात मिळते.
तसेच आधुनिक काळात अनेक जण आपल्या लग्न पत्रिकेत क्रिएटिव्ह आणि वेगळ्या शैलीचा वापर करतात. उदाहरणार्थ, काही जण छोट्या ओळींमध्ये भावना व्यक्त करतात, तर काही जण कवितेच्या स्वरूपात आमंत्रण देतात. यामुळे पत्रिका अधिक आकर्षक आणि लक्षात राहणारी बनते.
योग्य शब्दांची निवड का महत्त्वाची?
लग्न पत्रिकेतील शब्द हे केवळ माहिती देण्यासाठी नसतात, तर ते भावना व्यक्त करण्यासाठी असतात. योग्य शब्द निवडल्यास तुमची पत्रिका वाचणाऱ्याच्या मनात एक खास स्थान निर्माण करते. एक साधा संदेशही जर मनापासून लिहिला असेल, तर तो खूप प्रभावी ठरतो.
लग्न पत्रिका ही आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या आनंदाची पहिली झलक इतरांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे त्यामधील मेसेजेस आकर्षक, भावनिक आणि योग्य शब्दांत मांडलेले असणे आवश्यक आहे. पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा योग्य समतोल साधून, तुम्ही एक परफेक्ट मराठी लग्न पत्रिका तयार करू शकता.
योग्य लग्न पत्रिका मेसेजेस निवडून तुमचा खास दिवस अधिक सुंदर आणि संस्मरणीय बनवा.
