Kharach Maza Lek Aata Motha Hou Lagla Aahe

दुपट्यात गुंढाळलेला लेक माझा आता मोठा होऊ लागला आहे
आई जरा थांब म्हणत मलाच गुंढाळू लागला आहे
त्याची प्रेमळ दादागिरी माझ्यावर करू लागला आहे
खरंच माझा लेक आता मोठा होऊ लागला आहे

सकाळी उठल्यापासून त्याचा माझ्यावरती वॉच आहे
कामे करून दामू नको असा प्रेमळ धाक आहे
दमलीस तू कॉफी करतो ही त्याची ऑफर आहे
खरंच माझा लेक आता मोठा होऊ लागला आहे

आमचा किती विचार करतेस ह्याची त्याला जाणीव आहे
घर आणि बिजनेस ह्यात आई दमछाक तुझी होत आहे
मित्रांबरोबर असला तरी घरी एक कॉल आहे
खरंच माझा लेक आता मोठा होऊ लागला आहे

बाबाचे कपडे, बाबाचे शूज यावर त्याचे लक्ष आहे
फॉर्मल शर्ट बाबोबर बाबा टी शर्ट काळाची गरज आहे
इंटरव्हिव ला जाताना त्याला बाबांचा शर्ट लकी आहे
खरंच माझा लेक आता मोठा होऊ लागला आहे

इलेकट्रोनिक डिवाइस वापरताना मला त्याची शिकवणी आहे
त्याच्याशी बोलल्यामुळे माझे नॉलेज अपडेट आहे
कितीही मॉडर्न झाला तरी रात्री देवाला त्याचा नमस्कार आहे
खरंच माझा लेक आता मोठा होऊ लागला आहे

बाबा तू शेजारी बस म्हणत लॉन्ग ड्राईव्ह ला नेतो आहे
टू व्हीलर त्याची रिकामी तोवर त्याच्या बरोबर फिरणार आहे
एखादी पोरगी आवडली तर म्हणे तो मला सांगणार आहे
खरंच माझा लेक आता मोठा होऊ लागला आहे

पंख पसरून पिलू माझे उंच आकाशात झेपावणार आहे
उडताना घराची आठवण ठेव हीच माझी शिकवण अणे
या जनरेशनशी जुळवताना आपली थोडी दमछाक आहे
खरंच माझा लेक आता मोठा होऊ लागला आहे

दहावी पर्यंत आभ्यासात माझी मदत लागली आहे
स्वतःचे निर्णय आता तो स्वतः घेऊ लागला आहे
निर्णय माझा बरोबर ना? अशी मात्र विचारणा आहे
खरंच माझा लेक आता मोठा होऊ लागला आहे

त्याच्या मते आई बाबा सगळ्या जगात बेस्ट आहेत
बाबाचे शूज मुलाला होताना पाहण्यात जीवन माझे व्यस्त आहे
म्हणूनच म्हणते मंडळी हे सारे मस्त आहे
खरंच माझा लेक आता मोठा होऊ लागला आहे

कवी : UNKNOWN