Keshavache Bheti Laglese Pise Abhang Lyrics in Marathi केशवाचे भेटी लागलेंसे पिसें । विसरलों कैसें देहभान ॥१॥ झाली झडपणी झाली झडपणी । संचरलें मनीं आधीं रूप ॥२॥ ना लिंपेची कर्मि ना लिंपेची धर्मी । ना लिंपे जडधर्मी मुक्त पाप ॥३॥ ह्मणे गोरा कुंभार सहजी जीवन्मुक्त । सुखरूप अद्वैत झाले बाप ॥४॥ – संत गोरा कुंभार