कातरवेळीचे अजब खेळ
आठवणीतच होतो मेळ
चाहूल होतास तुझी
नकळतच थांबून जाते वेळ
मग तू ही हवी हवीशी वाटतेस
हलकेच अश्रू बनून दाटतेस
आठवणीच्या त्या समुद्र किनारी
मनी तू हळूच भेटलीस
समुद्र तो ही उफाणलेला असतो
अलगदच वारा त्याला शांत करतो
स्तब्ध ह्या मनाचे स्तब्ध ते भाव
हळूच तो आपल्या ओंजळीत भरतो
माझं मला रोज सारखाच
आज ही तो हळूच सावरतो
आज ही तो मला हळूच सावरतो
