Karita Vichar Sapadale Varma Abhang Lyrics in Marathi करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥ मज घेऊनिया आपणांसी द्यावें । साटी जीवें जीवें नारायणा ॥२॥ उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखेंचि भला करितां वाद ॥३॥ तुका ह्मणे माझें खरें देणें घेणें । तुह्मी साक्षी जाणें अंतरीचें ॥४॥ – संत तुकाराम महाराज