Kanda Mula Bhaji Abhang Lyrics in Marathi

कांदा मुळा भाजी
अवघीं विठाबाई माझी ॥१॥

लसुण मिरची कोथिंबिरी
अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस गाजर रातळू
अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट नाडा विहींर दोरी
अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥

सावता म्हणे केला मळा
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥

-संत सावतामाळी