Kamodini Kaay Jane Abhang Lyrics in Marathi कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥ तैसें तुज ठावें नाही तुझें नाम । आह्मी च तें प्रेमसुख जाणों ॥२॥ माते तृण बाळा दुधाचि ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥३॥ तुका ह्मणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाही त्याची भेटी भोग तीये ॥४॥ – संत तुकाराम महाराज