कामापुरता मामा, ताकापुरती आजी
जोवर पुरवू हट्ट तोवरी पत्नी असते राजी
मित्र म्हणोनी जवळ कराया कोणी योग्य दिसेना
तुटून पडते नाण्यावरती सारी वानरसेना
तोंडापुरती गोडी, पाठीवर चहाडी
पैशावाचुन वैद्य बघेना पिडलेल्यांची नाडी
लग्नाआधी जावई मागे जागा संसाराला
पैशावाचुन फुटे न अंकुर प्रेमाच्या बीजाला
नाती ना रक्ताची, विरघळत्या मेणाची
काका मामा बंधु भगिनी सगळी हो स्वार्थाची
पैसा असता मानमरातब, सलाम करतील सारे
अधनावस्था पाहून म्हणतील ‘दूर निघोनी जा रे’
हात करावा ओला, तेव्हा पुढचं बोला
गरिबासाठी येथे काठी, त्याला कुणीही टोला
