Kaay Majha Aata Pahtosi Abhang Lyrics in Marathi

काय माझा आतां पाहतोसी अंत ।
येईं बा धांवत देवराया ॥१॥

माझ्या जीवा होय तुजविण आकांत ।
येईं बा धांवत देवराया ॥२॥

येरे देवा नामा तुज बाहात ।
येईं बा धांवत देवराया ॥३॥

– संत नामदेव