Ka Uthlat Jivavar Mazya

का उठलात जिवावर माझ्या मी आहे कळी लहान
मी तर इवली फुलपाकळी उमलुन होईल महान

त्याने दिली जर मजला चोच दाना देईल तोच पाहुनी
बापा तू का व्यर्थ काळजीत रे बसलासी दडुनी

चिमूकलेच पाय माझे चिमूकलेच हात लहान
करुनी ओजंळ पुढ्यात तुमच्या मागते जगण्याचे दान
मी तर इवली फुलपाकळी उमलुन होईल महान

दिवाच हवा तुम्हा सगळ्यांना मी तर त्यातली वात वाहिनी
व्यर्थ ठरेल तोही मजवाचुन तव असाच देशाल कोप-यात ठेवुनी

फुलू द्या असेच झाङावरती नका घेऊ माझा प्राण
पाहून दिपतील चंद्र तारे कर्तृत्व माझे असा पायावर तुमच्या आणून ठेविल वान
मी तर इवली फुलपाकळी उमलून होईल महान

किती करू आर्जव तुम्हाकडे मी तर आहे बंदिस्त गर्भातुनी
येऊ द्या जन्मास मला प्रेमातुनी प्रेम देईल सर्वञ सांङूनी

अस्तित्व मी आई तुझे एकदा मिळव पुन्हा जगण्याचा मान
पावलांनी माझ्या इवल्याशा हुङकू जिवनाचे रान
मी तर इवली फुलपाकळी उमलुन होईल महान

कवी : UNKNOWN