थोडेसेच जेवण का असेना मेष आवडीने खाणार
गरम, चमचमीत पदार्थांवर यांची प्रथम नजर जाणार ।। १ ।।
वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे दाद देऊन जाते
लोणची – पापडासारखे पदार्थही अगदी चावी चवीने खाते ।। २ ।।
कधी मारुनी मिटक्या, कधी नन्नाचा चाले पाढा
मिथुनचे कौतुक मधाळ तर टीका कडवट काढा ।। ३ ।।
अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणत कर्केचे होते पूर्ण जेवण
रुचकर पण थंड अन्नही हे कसे पटकन करतात सेवन? ।। ४ ।।
राजस जेवणाच्या सिंहेचा केवढा राजेशाही थाट
थोड्या थोड्या सर्वच पदार्थांनी यांचे भरून जाते ताट ।। ५ ।।
कमी जास्त नाही ना? याची उगाच बाळगून भीती
इतरांकडे पाहून ठरते कन्येची जेवायची नीती ।। ६ ।।
भात – भाजी – आमटीबरोबर पचतील तेवढ्याच पोळ्या
अशा संतुलित आहारानंतर तूळ खाते पाचक गोळ्या ।। ७ ।।
काही मिसिंग आहे का कधी कळतही नाही
साधे नेहमीचेच जेवण पण वृश्चिकेला रुचत नाही ।। ८ ।।
कधी पटपट झटपट जेवण तर कधी अगदीच वेळकाढू
धनू काढत नाही जेवताना खोड्या पण वेळ मिळताच संधीसाधू ।। ९ ।।
ना कधी कौतुक ना कसली नकारघंटा
गपगुमाने जेवतो मकर करत नाही कधी थट्टा ।। १० ।।
निश्चित वेळ जेवणाची पार्टी असो वा एखादे लग्न
कुंभेची चिकित्सक वृत्ती नेहमी रेसिपी जाणण्यात मग्न ।। ११ ।।
कधी – कुठेही जमते मीनेची खाण्याशी गट्टी
पोटभर खाताना घेतात ‘डायट’ नावाशी कट्टी ।। १२ ।।
Kavi – Unknown
