Jethoni Udgaar Prasave Abhang Lyrics in Marathi जेथोनि उद्गार प्रसवे ॐकार । तोचि हा श्रीधरू गोकुळीं वसे ॥१॥ जनक हा जगाचा जिवलग साचा । तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥ नमो ये वैकुंठी योगियांचे भेटी । पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥ निवृत्ति साधन कृष्णरूपे खूण । विश्व विश्वीपूर्ण हरि माझा ॥४॥ – संत निवृत्तीनाथ