Jeev Dangala Gungala Song Lyrics in Marathi

जीव दंगला गुंगला रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

पैलतिरा नेशिल, साथ मला देशिल, काळिज माझं तू
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू

चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल,
सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू

खुळं आभाळ ढगाळ, त्याला रूढींचा इटाळ,
माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू

खुळं काळिज हे माझं तुला दिलं मी आंदण
तुझ्या पायावर माखीन माझ्या जल्माचं गोंदण

जीव दंगला गुंगला रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू

पैलतिरा नेशिल, साथ मला देशिल, काळिज माझं तू
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू

गीत – सं. कृ. पाटील
संगीत – अजय-अतुल
स्वर – हरिहरन, श्रेया घोषाल
चित्रपट – जोगवा