Jaya Mhanti Neech Varna Abhang Lyrics in Marathi

जया म्हणती नीचवर्ण ।
स्त्रीशुद्रादी हीनजन ॥१॥

सर्वांभूतीं देव वसे ।
नीचा ठायीं काय नसे ॥२॥

नीच कोठोनि जन्मला ।
पंचभूतां वेगळा जाला ॥३॥

तया नाहीं कां जनन ।
सवेंचि होत पतन ॥४॥

नीच म्हणोनि काय भुलीं ।
एका जनार्दनीं देखिली ॥५॥

– संत एकनाथ