Jani Jaay Paniyasi Abhang Lyrics in Marathi जनी जाय पाणियासी । मागें धांवे हृषिकेशी ॥१॥ पाय भिजों नेदी हात । माथां घागरी वहात ॥२॥ पाणी रांजणांत भरी । सडासारवण करी ॥३॥ धुणें धुऊनियां आणी । ह्मणे नामयाची जनी ॥४॥ – संत जनाबाई