House of Bamboo Song Lyrics in Marathi

नंबर फिफ्टि फोर
दि हाऊस विथ दि बॅम्बू डोअर
बांबूचे घर बांबूचे दार
बांबूची जमीन पिवळीशार

बांबूच्या वनात वार्‍याचा सूर
जिवाला नेतो भुलवुनी दूर
हाऊस ऑफ बॅम्बू

बांबूच्या वनात झर्‍याच्या काठी
येशील सजणे माझ्याच पाठी

बांबूच्या घरात स्वप्‍नाचा झूला
झुलवित राहील तुला नि मला
हाऊस ऑफ बॅम्बू

नंबर फिफ्टी फोर
दि हाऊस विथ दि बॅम्बू डोअर

बांबूचे घर पहायला हवे
बांबूच्या घरात रहायला हवे

रूपाचा उजेड डोळ्यांचा दिवा
बांबूच्या घरात तेवायला हवा
हाऊस ऑफ बॅम्बू

नंबर फिफ्टि फोर
दि हाऊस विथ दि बॅम्बू डोअर

गीत – शान्‍ता शेळके
संगीत – सी. रामचंद्र
स्वर – प्रमिला दातार, मन्‍ना डे
चित्रपट – घरकुल