हिरव्याहिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग् गो चेड्वा दिस्तां कसो खंडाळ्याचो घाट
हिरव्याहिरव्या झाडीत हिरवीहिरवी पान
हिरव्याहिरव्या पानांत वारो गाता गान
पुना – बाँबे हीच गो तुझ्या सासरची वाट
खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार
थंडीमधे लाली चढे गाली गुलजार
तोर्यामध्ये होऊ नको उगी अशी ताठ
बोगद्यात गाडी जाता होई अंधार
अंधारात प्रीत घेता प्रीतीचो आधार
इंजिनाच्या मागे जाती डबे मागोमाग
