Hil Hil Pori Hila Song Lyrics in Marathi

हिल हिल पोरी हिला,
तुझे कप्पालिला टिला
तुझे कप्पालिला टिला,
गो फॅशन मराठी सोभंय तुला

आरं जा जा तू मुला
का सत्तावितंय मला
का सत्तावितंय मला
न्‌ जाऊन सांगेन मी बापाला

धाकू पाटलाची पोर मी बेरकी,
अशी किती पोरं तुझ्यासारखी
आरं जेवण करायला पाणी भरायला
ठेवलीन्‌ घरकामाला

तुझी फॅशन अशी रे कशी,
लांब कल्ले तोंडात मिशी
तू डोळ्यानं चकणा, दिसं नाही देखणा,
चल जा हो बाजूला

तुझा पदर वार्‍याशी उडतो,
अगं बगून जीव धारधारतो
तुझी नखर्‍याची चाल करी जीवाचं हाल
माझे गुल्लाबाचे फुला

गीत – दादा कोंडके
संगीत – प्रभाकर जोग
स्वर – उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी
चित्रपट – आंधळा मारतो डोळा