हे एक रेशमी घरटे
जणू स्वप्नामधले वाटे
एक अनामिक आनंदाची
झुळूक इथे झुळझुळते
मायेच्या छायेखाली
प्रेमाची नाजुक वेली
मनमौजी झुलते डुलते
ना कधी नजर लागेल
हे सदा फुलत राहील
नंदनवन चौघांपुरते
दिन मावळता घरट्यात
अधिरा गहिरा एकान्त
कुणी कुणामध्ये विरघळते
