
प्रेमासाठी लाल,
समृद्धीसाठी हिरवा,
यशासाठी केशरी आणि
आनंदासाठी गुलाबी
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या रंगांचा आशीर्वाद मिळो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नष्ट होवो!
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोड पुरणपोळीचा घास,
मनात प्रेमाचा सुवास…
होळीचा सण साजरा करूया,
ठेवून सर्वांवर विश्वास!
होळी निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा !
आपल्या माणसांची साथ
पंगतीला पुरणपोळीचा थाट
होळीच्या अग्नीत नकारात्मकतेचा होणार नाश
पुन्हा नव्याने होऊदेत तुमच्या आयुष्याची सुरुवात
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जुने हेवेदावे जुनी भांडणे होळीमध्ये टाकूया,
विसरून जाऊ द्वेष आणि सारे नातेसंबंध राखुया
होळीच्या मराठमोळ्या शुभेच्छा
आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी सण रंगाचा
राग, द्वेष विसरून एकत्र येण्याचा
वाईटाला अग्नीमध्ये दहन करून
चांगल्या संकल्पना रूजवण्याचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठू दे मनी तरंग
तोडूनी बंध सारे,
असे उधळूया आज हे रंग…
होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्या.
होळी निसर्गातील पानगळ जाळण्यासाठी
होळी मनातील वाईट विचार जाळण्यासाठी
असा हा सण मनातील मरगळ घालविण्यासाठी
मनाला नवचेतना देण्यासाठी
होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा
मनोभावे करूया होलीका मातेची पूजा
मनातील वैरभाव करूया वजा
होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा
कुत्रीम रंगांना टाळू या
नैसर्गिक रंग वापरु या
पाण्याची बचत करता
पर्यावरणाचे भान जपू या
धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दृष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सवाचा
साजरा करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
जीवन रंगीत असो,
दुःखाचा एकही रंग नसो!
आपले नाते घट्ट व्हावे,
हीच ईश्वराकडे मागणे असो!
होळीच्या अणि रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आपल्या माणसांची साथ
पंगतीला पुरणपोळीचा थाट
होळीच्या अग्नीत नकारात्मकतेचा होणार नाश
पुन्हा नव्याने होऊदेत तुमच्या आयुष्याची सुरुवात
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
वाईट सारे जळून जावे
चांगले ते उदयास यावे
दृष्ट प्रवृत्तींचा होवो नाश
सर्वांना लाभो सुख: शांती खास
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
वाईटावर चांगल्याचा विजय,
होळीच्या सणाचा हाच खरा आशय
सर्वांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
होळी पेटू दे
द्वेष, मत्सर जळू दे
आगामी वसंत ऋतूत
तुमच्या आयुष्यात
सुख-समृद्धीची उधळण होऊ दे!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
आली रे आली, होळी आली,
चला आज पेटवूया होळी,
बांधून दुख-नैराश्याची मोळी,
दाखवू नैवद्य पुरणपोळीचा,
करू आनंदाने साजरी सण होळीचा,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो
आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांती नांदो..
होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी आणि रंगपंचमी – आनंद, रंग आणि शुभेच्छांचा उत्सव
होळी आणि रंगपंचमी हे भारतीय संस्कृतीतील आनंद, उत्साह आणि एकोप्याचे प्रतीक असलेले सण आहेत. फाल्गुन महिन्यात येणारी होळी हिवाळ्याचा निरोप देऊन वसंत ऋतूचे स्वागत करते. या सणामध्ये जुने वाद, मतभेद आणि कटुता विसरून नव्या सुरुवातीचा संकल्प केला जातो. रंगांची उधळण, पारंपरिक गाणी, ढोल-ताशांचा नाद आणि गोडधोड पदार्थ यामुळे वातावरण पूर्णपणे उत्सवी बनते.
होळीची पौराणिक कथा
होळीमागे प्रचलित असलेली कथा हिरण्यकश्यपू आणि प्रह्लाद यांची आहे. हिरण्यकश्यपू हा अहंकारी राजा स्वतःलाच देव मानत होता. परंतु त्याचा पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूचा भक्त होता. वडिलांच्या विरोधात जाऊनही त्याने भक्ती सोडली नाही.
संतापलेल्या हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणी होलिकेला प्रह्लादाला अग्नीत बसवण्यास सांगितले. होलिकेला अग्नीपासून संरक्षणाचा वर होता; पण देवाच्या कृपेने प्रह्लाद वाचला आणि होलिका भस्मसात झाली. म्हणूनच होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. हा प्रसंग सत्य, श्रद्धा आणि भक्तीचा विजय दर्शवतो.
रंगपंचमीचे सांस्कृतिक महत्त्व
होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. महाराष्ट्रात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. विविध रंगांच्या उधळणीने आणि आनंदी वातावरणाने नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होतो. समाजातील सर्वजण एकत्र येऊन सण साजरा करतात, त्यामुळे बंधुभाव अधिक दृढ होतो.
होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छांचे महत्त्व
आजच्या डिजिटल युगात होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा संदेशांना विशेष स्थान आहे. सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर माध्यमांद्वारे मनापासूनच्या शुभेच्छा पाठवल्या जातात. मराठीत दिलेल्या शुभेच्छा अधिक भावनिक आणि जिव्हाळ्याच्या वाटतात. रंगांसारख्याच या शुभेच्छाही नात्यांमध्ये आनंद आणि सकारात्मकता पसरवतात.
होळी आणि रंगपंचमी हा केवळ रंगांचा सण नसून प्रेम, एकात्मता आणि आनंदाचा संदेश देणारा उत्सव आहे. या सणांच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि रंगांची उधळण कायम राहो, हीच भावना.
