गुंठा गुंठा जमीन विकून आम्ही सोसायटी लढवली
एकमेकांच्या जिरवा जिरवीत आम्ही आमचीच जिरवली
त्याच्या पोराचा लग्न मंडप माझ्या दरवाजापर्यंत आला
मी भी एकराचा तुकडा विकून पोराच्या लग्नात धिंगाना केला
त्याने दोन चाकी घेतली तर मी चार चाकी घ्यायचं ठरलं
बँकेत घरदार गहाण ठेऊन मी माझंच घोडं नाचवलं
गुंठा गुंठा सारी जमीन गेली, घर सोडायची पाळी आली
जिरवा जिरवीच्या नादात मला तोंड लपवायची पाळी आली
माझ्या नादात त्याची गेली, त्याच्या नादात माझी गेली
घरदार जमीन गाडी इज्जत बॅंकेवाल्यांनी उतरवून नेली
कवी : UNKNOWN
