माझ्या मनाची व्यथा तुला कळायची नाही
डोळ्यातले प्रेम माझ्या तुला दिसायचे नाही
जीव पार जडला तुझ्यावरी तुझ्याविणा जगायचे नाही
बोल अंतरीचे माझे तुला कळायचे नाही
प्रेम माझे तुझ्यावर कधी संपायचे नाही
तुला पाहण्याचा मोह कधी संपणार नाही
हातात हात माझ्या देउनी या जगात
चल बांधूया घरटे सुरेख सुखी आयुष्यात
हीच इच्छा उरात शेवट गोड व्हावा
श्वास शेवटचा माझा तुझ्या मिठीत निघावा
