Ge Maybhu Tuze Mi Suresh Bhat

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा
शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा

आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला

मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी
माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी

आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी

कवी : सुरेश भट


View All Marathi Deshbhakti Kavita

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *