Gandha Ha Shwas Ha Song Lyrics in Marathi

गंध हा श्वास हा स्पर्श हा सांगतो
तूच तो तूच तो तूच तो

हे धुंद डोळे नशिले नशिले
मला वेड यांनीच रे लाविले
हे ओठ राजा रसिले रसिले
स्वप्‍नात रे मीच ओलावले
हे ओळखीचे तुझे हासणे
माझी मला खूण आता कळे

या मनी जो कुणी दिलरूबा छेडितो
तूच तो तूच तो तूच तो

ये राजसा हा दुरावा कशाला
घडी मीलनाची उभी राहिली
या झिंगलेल्या गुलाबी निशेची
किती काळ रे वाट मी पाहिली
कितीही लपविले खरे रूप तू
मी जाणिले कोण आहेस तू

बहुरूपी जो कुणी खेळ हा खेळतो
तूच तो तूच तो तूच तो

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – आशा भोसले
चित्रपट – आराम हराम आहे