Whatsapp Marathi Jokes

१०-१५ साधू हिमालय चढत होते.
एक भाविक : महाराज आपण कुठे चाललात?
साधु : समाधी घ्यायला !
भाविक : पण का?
साधु : अरे या जगात व्हाट्सअप आल्यापासून जो तो एकमेकांना ज्ञान व उपदेश द्यायला लागलायं, आता या संसारात आमची गरजच काय?


व्हाट्सअप म्हणजे जसं कोंबडीचं खुराडच झालयं. तासातासाला उघडून पहावं लागतय कोणी अंड दिलयं का?


पुढच्या पिढीतली आई आपल्या तरुण मुलाला रागावताना म्हणेल, “गधड्या, अरे तुझं सगळं व्यवस्थित करण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ चार-चार तास व्हॉट्सअप बंद ठेवलंय मी… कितीतरी लाईक करायचे राहून गेले… ग्रुपवर असूनही नसल्यासारखं आयुष्य जगले… दिवस-दिवस फेसबुक न बघण्याच्या खस्ता खाल्ल्या… पण तुला आहे का काही त्याचं?”


एक शहरातला मुलगा लग्नासाठी गावाकडे मुलगी बघायला जातो व मुलीला विचारतो: तुला व्हॉट्सअप चालवता येतं का?
मुलगी : नाही, लग्नानंतर तुम्ही चालवा मी मागे बसेन.
पोरगा खुश होऊन जोरजोरात ओरडतो, मला हीच पोरगी पाहिजे!


Chatting साठी तोंडासमोर धरलेला मोबाईल तोंडावर आपटला की समजायचं आता झोपायला पाहिजे


मला नेहमी एक प्रश्न पडतो की जे लोक कधी कुणाला WhatsApp Message पाठवत नाही की कुणाला कधी रिप्लाय देत नाहीत. फक्त फुकट मेसेज वाचतात… ते लोक नेट पॅक मारून नक्की काय बरं करत असतील?


आज कालची मुले शाळेत टाईमपास म्हणून WhatsApp आणि Facebook वापरतात.
आणि एक आम्ही होतो कि पुस्तकावर लावलेल्या पेपरच्या कव्हर वरच्या मुलीला मिशा काढून टाईमपास करायचो


साधेपणा तिचा काय सांगावा, ती आज देखील WhatsApp Chatting करताना डोक्यावर पदर घेते


तुम्हाला Facebook आणि WhatsApp च्या मदतीने पैसे कमवायचे आहेत का?
तर मग दोन्हीही delete करा फोन मधून आणि कामाला लागा


हे WhatsApp म्हणजे लहान बाळाच्या लंगोटीसारखे आहे. दार ५ मिनिटांनी ओलं झालंय का म्हणून बघावं लागतंय


एकदा मी WhatsApp ला Online होतो, अचानक नेट पॅक संपले तेव्हा मी माझ्या मित्राला फोन केला.
त्याने मला ५० रु चा रिचार्ज केला आणि सकाळी त्याला नोकरी मिळाली
मग त्याने दुसऱ्याला हा किस्सा सांगितला. त्याने मला १०० रु चे रिचार्ज केला, त्याला एक लाख रुपयांची लॉटरी लागली
हे ऐकून एकाने मला २५५ रु चा रिचार्ज केला तर त्याला शेतात धन सापडले
एक माणूस तर फक्त मला नेटचा रिचार्ज करू का असा विचारच करत होता तत् त्याला रस्त्यावर आय फोन ७ सापडला.
एका माणसाने या मेसेजची खिल्ली उडवली तर त्याचा फोन हँग झाला व बॅटरी फुटली
दुसर्याने या गोष्टीचा मजाक केला तर त्याला मोबाईल चार्जिंग करते वेळी शॉक लागला व त्यातच तो पागल झाला
बाकी तुमची मर्जी, माझा WhatsApp नंबर तर तुमच्याकडे आहेच. आपापल्या श्रेद्धेनुसार रिचार्ज करावे


एक मुलगा देवाला विचारतो, “तिला गुलाबाचं फुल का आवडतं? ते तर एका दिवसात मारून जातं. मग तिला मी का आवडत नाही? मी तर रोज तिच्यासाठी मरत असतो.”
देव म्हणतो, “भारी रे… WhatsApp वर टाक”


WhatsApp चा सर्वात मोठा फायदा काय आहे???
अनेक स्त्रिया आपापसात खूप बोलत असतात पण आवाज आजिबात होत नाही


आपला WhatsApp ग्रुप पण सरकारी प्राथमिक शाळेसारखा झाला आहे
थोडीच मुलं वाचतात आणि लिहितात
बाकीच्यांनी फक्त खिचडी मिळणार म्हणून शाळेत नाव घातलं आहे


पूर्वी लोक “ज्वेलरी” लपवायचे
मग “सॅलरी” लपवायला लागले
आणि आता WhatsApp ची “गॅलरी” लपवतात


आयुष्यात इतकी खाली मान घालायची वेळ कधीच आली नव्हती जितकी WhatsApp मुळे आलीय


एक लहान पोरगं हारवल. कोणी तरी त्याचा फोटो whatsapp वर टाकला आणि मुलाला शोधन्यासाठी फोटो फॉरवर्ड करा असे लिहिले. संध्याकाळी हरवलेलं पोरगं घरी आलं.
आज एक वर्ष झाल आहे, त्याचा फोटो अजुन फॉरवर्ड होत आहे. ते पोरगं जिथं पन जात तिथून लोक त्याला पकडून त्याच्या घरी
सोडून येतात


खेड्यातली मुलगी मैत्रिणीला विचारते – ३ दिवसा पूर्वी एका पोरानं WhatsApp वर स्टेटस टाकले “Sleeping”
३ दिवस झाले अजुनही WhatsApp Status बदललं नाही. मेलं बिलं तर नसेल ना ग??


फोन वरून संभाषण
मुलगा : WhatsApp डाउनलोड कर ना
मुलगी : कसं करतात?
मुलगा : Play Store मध्ये जा, आणि तेथून डाउनलोड कर ना
मुलगी : आमच्या गल्लीत Play Store नाहिय रे, “मेवाड जनरल स्टोर” आहे तिथून करू का?
मुलगा – जाउदे तू भांडी घास


किती WhatsApp ग्रुप मध्ये आहे मी पण माझे नाव सर्वात शेवटी असते. कधी आरक्षण मिळणार मला???


भारतात ज्ञान वाटणा-या महान टाँप ४ युनिव्हर्सिटी
१. WhatsApp
२. पान टपरी
३. केस कटिंगचं दुकान
४. दारू पिलेला माणूस
बाकी शाळा वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे


अर्ध्यापेक्षा जास्त WhatsApp ग्रुप बंद होतील जर सरकारने सांगितले कि
ऍडमिन बनण्यासाठी १२ वी ला ८०% जरुरी आहे…
सगळ्यात आधी आपला ग्रुप बंद होईल


WhatsApp व्रताची कथा
एक आटपाट नगर होतं. तिथे एक सुंदर स्त्री राहत होती. घरगुती कटकटींनी कंटाळलेली, मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत होती. परंतु धीटपणे कर्तव्याला सामोरी जात होती. जबाबदारीचे ओझे, एकटेपणाची जाणीव या सगळ्यांनी ती ग्रासली आणि आजारपणाच्या गुतड्यात फसली.
तशातच एक दिवशी तिच्या लेकीने दिला SmartPhone भेट आणि WhatsApp मुळे मित्र मैत्रिणींशी संवाद घडू लागला थेट. काही दिवसात आजारपण दूर झाले, चिकटून बसलेले बी. पी. शुगर नॉर्मल झाले. ती आनंदली आणि WhatsApp व्रताची महती आल्या गेल्याला सांगू लागली.
तिची एक सखी निर्मळ मनाची, ती म्हणाली मला पण सांग ना ग हे व्रत! उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही.
स्त्री म्हणाली रोज सकाळी उठता क्षणी ह्या देवाचे दर्शन करावे. Good Morning, Good Night चा वेळोवेळी जप करावा.
एका ग्रुप ने WhatsApp  ला वाहिलेले सर्व काही दुसऱ्या WhatsApp Group ला यथाशक्ती मनोभावे अर्पण करावे. रुसू नये, रागवू नये, आपला ग्रुप सोडू नये.
त्या सखीने मनोभावे केले व्रत आणि आश्चर्य, चारच महिन्यात मिळाले फळ. तुम्हीही हे व्रत धरावे. कामकाज वेळ सांभाळून त्रिकाळ WhatsApp ला पूजावे.
जसा हा WhatsApp देव त्या दोघी सखींना पावला तास तुम्हास हि पावो. ही साथ उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण


WhatsApp प्युअर मराठी उखाणा
तुका म्हणे जीवा लागलीसी आस । ऍडमिन देताहेत पार्टी ऐसा होतसे भास
यावर ऍडमिनचे उत्तर
तुका म्हणे लोभ ना करावा । ऍडमिनचेच झालेत वांदे आपला बंदोबस्त आपणच करावा


टीचर : बंड्या तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?
बंड्या : बाई मी गरीब घरचा आहे WhatsApp मला परवडत नाही


चिमण्यांची किलबिलाट झाली अन जग आली
त्यातून एक चिमणी हळूच येऊन कानात म्हणाली
उठा WhatsApp बघायची वेळ झाली


मास्तर : गोट्या सांग या ग्रुप वर इतके सदस्य आहेत तरी थोडेच लोक मेसेज टाकतात…. कारण काय?
गोट्या : सर, शाळेत फक्त २-३ मुले हुशार असतात, सगळी शाळा थोडीच हुशार असते?


Marathi Jokes Whatsapp


कामवाली बाई न सांगता सुट्टी घेऊन जेव्हा परत येते तेव्हा मालकीण रागाने विचारते : सांगून का नाही गेली?
तेव्हा कामवाली म्हणते : WhatsUp वर स्टेट्स वाचलं नाही का? “गावाला ४ दिवसांसाठी जातेय”
सायबांनी तर कमेंट पण टाकली होती : “Miss You, लवकर ये” म्हणून


WhatsApp वापरणाऱ्यांच्या विविध राशी
मेष : बेधडक प्रत्येक ग्रुप वर डोके आपटणारी रास. सगळेच मेसेज यांना आवडतात परंतु सहसा फॉरवर्ड करत नाहीत.
वृषभ : दर अर्ध्या तासाला अपडेट मेसेज. यातच त्यांचा इतका वेळ जातो की बाकीच्यांचे मेसेज या राशी पहात नाहीत.
मिथुन : मेसेज न पाठविता चॅटिंग करण्यावर जोर. गप्पा मारतात. कोणी नसेल बोलायला तर उगाच “काय आहे, कुठे आहेस, विसरलास काय” असे म्हणत सगळ्या कॉन्टॅकट्सना हाकत सुटतात.
कर्क : फार कनवाळू रास. आपल्यामुळे कोणाला त्रास नको म्हणून प्रत्येक मेसेज स्वीकारतात. प्रत्येक पोस्टला लाईक करून कमेंट करतात. दुसऱ्याचे मेसेज तिसऱ्याला पाठवतात. पण यांच्या मेसेज ला जर तुम्ही चुकून कमेंट नाही दिली तर मनाला लावून घेतात मग कितीतरी महिने मेसेज पाठवीत नाहीत.
सिंह : या राशीला फक्त स्तुती आवडते. हे फक्त लाईक केल्याबद्दलही धन्यवाद देतात. “वा छान” या दोन शब्दांनीही हुरळून जातात आणि मी तुमचा ऋणी राहीन म्हणतात. प्रत्यक्षात तो मेसेज श्रद्धांजलीचा का असेना, यांना त्यावर कमेंट असली की झाले.
कन्या : वृषभ प्रमाणे हे नुसते दर पंधरा मिनिटाला मेसेज फॉरवर्ड करतात. फरक इतकाच की वृषभवाले सगळं शोधून पण हे मात्र तयार रि-शेयर करतात अगदी प्रत्येक.
तूळ : “ठेविले अनंते तैसेची राहावे” या उक्तीवर जगणारी. कधी कुणाला कमेंट नाही, मेसेज नाही, पहिल्या दिवशी लावलेला प्रोफाइल पिक्चर. जुनाट विचारांमुळे नवीन व्हर्जन कधीच वापरात नाहीत.
वृश्चिक : प्रत्येक मतावर विरुद्ध मताची प्रतिक्रिया. प्रत्येकाशी भांडण हा यांचा छंद आणि व्यवसाय पण. यांच्या मेसेज विरुद्ध कोणी मत मांडलं तर खपवून घेत नाहीत. तोंडाला फेस आल्याशिवाय सोडत नाहीत तुम्हाला.
धनु : फक्त मोठेपणाचा सोस असतो यांना. सगळे सेलिब्रेटी फोटोस आणि त्यांचे व्हिडिओज असतात. बाकी मेसेज मध्ये यांना काही रस नसतो.
मकर : यांना मित्रपरिवार कमी असतो. कारण हे WhatsApp पेक्षा Google वर पडीक असतात. आणि WhatsApp वर चुकून आलेच तर “चैतन्याचे आदिमूळ बीज आत्मा स्वरूप आहे” अशा प्रकारचे मेसेज करून निघून जातात.
कुंभ : परोपकारी राशी. आपल्या WhatsApp वापरण्याने सर्वांना रोजगार मिळाला अशी यांची भावना असते. सतत प्रत्येकाला मदत करतात. जे आवडलं त्याबद्दल भरभरून बोलतात आणि आवडत नसेल तर न बोलता शांत बसतात.
मीन : खाओ पीओ मजा करो हा यांचा स्टेट्स मेसेज. हे कधीच नेट डिस्कनेक्ट करत नाहीत.


Whatsapp Jokes in Marathi


WhatsApp ऍडमिनला विचारले लावणीला येतोस काय?
ऍडमिन घरी गेला व टकाटक होऊन आला. त्याला विचारले एवढा टकाटक का? शेतात कपडे खराब नाही का होणार?
ऍडमिनचा चेहरा पडला. कारण सांगायला हवे का? त्याला तमाशातील लावणी वाटली.


वडिलांनी WhatsApp इन्स्टॉल केले आणि मुलाला मेसेज पाठवला
बाबा : मला जोक पाठव
मुलगा : मी आता अभ्यास करतोय
बाबा : हा हा हा … आजून एक पाठव


आता पाऊस पडलाय. ग्रुपमध्ये सुस्तावलेल्या आणि कधीही चॅटिंग न करणाऱ्या बेडकांनी बाहेर पडायला हरकत नाही
बाहेर येऊन निदान डराव डराव तरी बोला


ग्रुपचा नवीन निर्णय –
जो सदस्य एका आठवड्यात एकही मेसेज पाठवणार नाही त्याला …
पालखी बरोबर पंढरपूरच्या वारीला पाठविले जाईल


कृपया करून आपल्या ग्रुप मेंबरची तपासणी करा
एखादा पावसात वाहून तर गेला नाही ना
मेसेजेस कमी येऊन राहिले


जगात सर्वात जास्त चोऱ्या होणारे सार्वजनिक ठिकाण – WhatsApp
टीप : आता हे पण चोरतील


Marathi Jokes For Whatsapp


गंगुबाई : काय हो शांताबाई तुमच्या मुलीला कुठलं स्थळ आलं होतं आज पाहायला ?
शांताबाई : फार चांगलं स्थळ आलं आहे मुलीच्या लग्नासाठी
गंगुबाई : काय करतो मुलगा ?
शांताबाई : मुलगा व्हाट्सएपच्या कंपनीत ग्रुप ऍडमिन पदावर नोकरीला आहे. पूर्वी १०० लोक होते आता २५६ लोक त्याच्या हाताखाली काम करतात म्हणे


आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो
पर्वत कितीही विशाल असो, एकच लक्षात ठेवा,
तुम्हाला या सगळ्यांशी काहीही देणं घेणं नाहीय
तुम्ही फक्त आज कोण पाजणार, कुठे बसायचे आणि
घरी काय सांगायचे यावर लक्ष केंद्रित करा


मुली मुलांपेक्षा खूप हुशार आहेत. सोलापूर विद्यापीठांचे कुलगुरू एका समारंभात भाषण करताना म्हणाले
“मेरीट लिस्ट बघितल्यावर असे दिसते कि या वेळी मेरीट मध्ये येणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा खूपच जास्त आहे”
“म्हणजे मुली मुलांपेक्षा खूप हुशार आहेत”
असे म्हटल्यावर उपस्थीत मुनींनी टाळ्यांचा कडकडाट केला …
ते पुढे म्हणाले …
पण मुलांनी नाराज व्हायचे कारण नाही … कारण या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत
टाळ्यांचा कडकडाट दुप्पट झाला


Marathi WhatsApp Jokes

Liked it? Share with your friends...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *