El Lajara Na Sajara Mukhda Song Lyrics in Marathi

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा चंद्रावाणी फुलला गं
राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला गं
ह्या एकान्‍ताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येती मला की जीव माझा भुलला गं

नको राणी नको लाजू, लाजमधी नको भिजू
इथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू
का?
बघत्यात !

रेशीम विळखा घालून सजणा नका हो कवळून धरू
लुकलुक डोळं करून भोळं बघतंय फुलपाखरू
कसा मिळावा पुन्हा साजणी मोका असला गं

डोळं रोखुन थोडं वाकून झुकू नका हो पुढं
पटघुम पटघुम करून कबूतर बघतंय माझ्याकडं
लई दिसानं सखे आज ह्यो धागा जुळला गं

बेजार झाले सोडा सजणा, शिरशिरी आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं?

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – राम कदम
स्वर – अरुण सरनाईक, उषा मंगेशकर
चित्रपट – चंदनाची चोळी अंग अंग जाळी