Ektatva Naam Drudha Dhari Abhang Lyrics in Marathi एक तत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसि करुणा येईल तूझी ॥१॥ तें नाम सोपारें राम कृष्ण गोविंद । वाचेसीं सद्गद जपें आधीं ॥२॥ नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । वायां आणिका पंथा जासी झणें ॥३॥ ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं । धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥ – संत ज्ञानेश्वर