Ek Aathvan Marathi Kavita

आठवत गेलो तर त्या जुन्या आठवणी ताज्या होतात,
त्या आठवणीतील सर्व रात्री तुझ्या आठवणीत माझ्या होतात,

काही आठवणी आठवायच्या असतात
काही आठवणी विसरायच्या असतात
तर काही आठवून सुद्धा विसरल्या सारख्या दाखवायच्या असतात

म्हणून माझे मन मला सांगत असते
विसरत नसेल तर परत परत आठवू नको
कुणासाठी जगतोय हे कधीही विसरू नको
दुरावणाऱ्या गोष्टींना आपलेसे करू नको

“ती गेलीय तुला विसरून, परत परत तिच्या आठवणीत तू अश्रू गळू नको…”

कावी : विजय नन्नावरे