Dhav Ghali Vithu Aata Abhang Lyrics in Marathi धांव घालीं विठू आतां चालूं नको मंद । बडवे मज मारिति ऐसा कांहीं तरि अपराध ॥१॥ विठोबाचा हार तुझ्या कंठीं कैसा आला । शिव्या देती ह्मणती महारा देव बाटविला ॥२॥ जोडुनियां कर चोखा विनवितो देवा । बोलिला उत्तरीं परि राग नसावा ॥३॥ – संत चोखामेळा