Dharila Pandharicha Chor Abhang Lyrics in Marathi धरिला पंढरीचा चोर । प्रेमें बांधुनियां दोर ॥१॥ हृदयी बंदिवान केला । आंत विठ्ठल कोंडला ॥२॥ शब्दें केली जडाजडी । पायीं विठ्ठलाचे बेडी ॥३॥ सोहं शब्द नाद केला । विठ्ठल काकुळती आला ॥४॥ जनी ह्मणे बा विठ्ठला । जीवें सोडीं न मी तुजला ॥५॥ – संत जनाबाई