Dhag Datun Yetat Song Lyrics in Marathi

ढग दाटुनी येतात, मन वाहुनी नेतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होउनी गातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते माझ्यात

माती लेवुनिया गंध, होत जाते धुंद धुंद
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध
मुळे हरखुनी जातात, झाडे पाऊस होतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होउनी गातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते माझ्यात

सुंबरान गाऊया रं, सुंबरान गाऊया
झिलरी हिलरी आम्ही तुम्ही सुंबरान गाऊया
सुंबरान गाऊया रं सुंबरान गाऊया

जीव होतो ओला चिंब, घेतो पांखराचे पंख
सार्‍या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजुनी जातात, अर्थ थेंबांना येतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होउनी गातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते माझ्यात !

गीत – सौमित्र
संगीत – अशोक पत्की
स्वर – साधना सरगम
चित्रपट – आईशप्पथ