Devasi To Pure Ek Prembhav Abhang Lyrics in Marathi देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥ मनापासूनियां करितां कीर्तन । आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥ रामकृष्णहरि उच्चार सर्वदा । कळिकाळ बाधा तेणें नोहे ॥३॥ एका जनार्दनीं हाचि पैं विश्वास । सर्वभावें दास होईन त्याचा ॥४॥ – संत एकनाथ