Devachiye Dwari Ubha Kshan Bhari Abhang Lyrics in Marathi

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी
तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥१॥

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा
पुण्याची गणना कोण करीं ॥२॥

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं
वेदशास्‍त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

ज्ञानदेवो ह्मणे व्यासाचिये खुणे
द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥

– संत ज्ञानेश्वर