Deva Tuzya Dari Aalo Song Lyrics in Marathi

हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया

हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया

ॐकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाडंवेली पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठिराखा, गरिबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया

आदिअंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला, पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी, गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया
मोरया मोरया मोरया मोरया

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया
मोरया मोरया मोरया मोरया

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोटयानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

गीत – जगदीश खेबूडकर
संगीत – अजय-अतुल
स्वर – अजय गोगावले, अतुल गोगावले
चित्रपट – उलाढाल