Dev Mhane Namya Pahe Abhang Lyrics in Marathi

देव म्हणे नाम्या पाहें
ज्ञानदेव मीच आहे ॥१॥

तो मी नाहीं दुजा
ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥

माझ्या ठायीं ठेवीं हेत
सोड खंत खंडी द्वैत ॥३॥

नाम्या उमज मानसीं
ऐसें म्हणे हृषिकेशी ॥४॥

आत्मरूपीं ज्ञानेश्वर
तोचिं ज्ञानाचा सागर ॥५॥

ज्ञानदेवें धरीं भाव
स्वयें होसी तूंचि देव ॥६॥

– संत नामदेव